शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : गृहमंत्रालयात ज्युनियर कर्मचारी पाहायचे पॉर्न व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:14 IST

गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे.

मुंबई - गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही ज्युनियर कर्मचारी ऑफीसमध्येच पॉर्न फिल्म पाहायचे, तसेच असे व्हिडिओ डाऊनलोड करायचे, त्यामुळे कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये समस्या उद्भवत असे, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमसचिव जी. के. पिल्ले यांनी केला आहे. डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (डीएससीआय) अध्यक्ष असलेले पिल्ले म्हणाले, "आठ नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मी केंद्रीय गृहसचिव म्हणून कार्यरत होतो. तेव्हा दर दोन महिन्यांनी संपूर्ण संगणक प्रणालीमध्ये बिघाड झालेला आमच्या निदर्शनास येत असे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संध्याकाळी उशिरापर्यंत बैठकांमध्ये गुंतलेले असायचे, त्यामुळे ज्युनियर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावे लागत असे. या वेळेत हे कर्मचारी इंटरनेटवर जाऊन अश्लील वेबसाइट्सना भेट देत असत. तिथून ते विविध व्हिडिओ डाऊनलोड करत असत. या व्हिडिओंसोबत मालवेअरही डाऊनलोड होत असत."गृहमंत्रालयाने केलेल्या सखोल चौकशीमधून कर्मचाऱ्यांकडून होत असलेले हे गैरप्रकार उघड झाले होते.  गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पिल्ले यांनी हा गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली आहे. मात्र गृहमंत्रालयाच्या वेबसाइट हॅक झाल्या नसून हार्डवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्रालयाकडून देण्यात आले होते.   

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयEmployeeकर्मचारीnewsबातम्या