शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला लागली गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 17:58 IST

Ram Mandir Ayodhya: कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येमधील राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज अयोध्येत येत असतात. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.

रामललांचे प्रमुख पुजारी आचार्च सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या  गर्भगृहाच्या छतामधून काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती. त्यानंतर दुरुस्तीचं काम करून ही गळती बंद करण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसामध्ये मंदिरात पुजाऱ्यांचं बसण्याचं ठिकाण आणि व्हीआयपी दर्शनासाठी जिथे लोक येतात, त्याठिकाणी पावसाचं पाणी गळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

रामललांचे मुख्य पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडण्यात आलं होतं. मात्र मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामललांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे. राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी झाल्याचं दिसत आहे. रात्री पाऊस पडला. तसेच सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा तिथे पाणी भरलेलेल दिसून आले. खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहितीही त्यांनी दिली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRainपाऊस