शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग ! रुग्णालयात बेड शिल्लक, तरीही नवजात बाळाची ऑक्सिजनवर रिक्षातून भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:43 IST

रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बाळासह कुटुंब रुग्णालयातील बेडसाठी भटकंती करत राहिले. मात्र, येथेही व्हेंटीलेटर नसल्याचे कारण देत त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले.

ठळक मुद्देबीएचयू रुग्णालयातच लहान मुलांसाठीचे बेड आणि ऑक्सिजन रिकामे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयात एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड रिकामे असतानाही प्रशासनाने या बाळास परत पाठवले.

वाराणसी - कोरोना महामारीच्या संकटात अनेकदा माणूसकीचा आदर्श निर्माण करणारी उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. तर, कुठे माणूसकीला काळीमा फासणाऱ्याही घटना घडल्या आहेत. कधी मेडकिल वाल्यांकडून, कधी डॉक्टरांकडून, कधी इतर सेवा पुरविणाऱ्यांकडून अशा घटना घडल्याचं आपण पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात वाराणसीमधील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लहान मुलाच्या उपचाराबाबत रुग्णालयाकडून निष्काळजीपणा केल्याचं समोर आलं आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा मोठ्या तुटवड्याचा सामना आपणास करावा लागला आहे. आता तिसऱ्या लाटेपूर्वी काळजी घेण्यात येत आहे. वाराणसीमध्येही तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता घेऊन, शासन आणि प्रशासन तयारीला लागले आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतच लहान बाळावरील उपचारासाठी बीएचयू रुग्णालयाने निष्काळजीपणा केला आहे. येथील एका 10 दिवसांच्या बाळाला रुग्णालयात बेड नसल्याचे कारण देत दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बाळासह कुटुंब रुग्णालयातील बेडसाठी भटकंती करत राहिले. मात्र, येथेही व्हेंटीलेटर नसल्याचे कारण देत त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. मात्र, बीएचयू रुग्णालयातच लहान मुलांसाठीचे बेड आणि ऑक्सिजन रिकामे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयात एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड रिकामे असतानाही प्रशासनाने या बाळास परत पाठवले. सैदपूरच्य महमदपूर येथील शशीभूषण यादव यांच्या बाळाचा जन्म सैदपूरच्या एका रुग्णालयात झाला होता. येथे बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे डॉक्टरांनी वाराणसी येथील खासगी रुग्णालयात रेफर केलं. 

शशीभूषण आपल्या भावासह या लहान मुलास घेऊन महावीर मंदिरजवळील रुग्णालयात पोहोचले. मात्र, तेथेही रुग्णास बीएचयू येथे रेफर करण्यात आले. त्यावेळी, बीएचयू येथे या चिमुकल्यास घेऊन त्याचे कुटुंबीय पोहोचले. प्राथमिक तपासणी करुन काही औषधेही देण्यात आली. मात्र, अर्ध्या तासानंतर रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगत बाळासह त्याच्या वडिलांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. विशेष म्हणजे बीएचयू रुग्णालयातूनच ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले, जे रिक्षात लावून कुटुंबीय बेडसाठी दुसरीकडे भटकले. 

बीएचयू रुग्णालयात बेड रिकामे असतानाही बाळासह कुटुंबीयांना परत पाठवल्याची घटना एम.एस. केके. गुप्ता यांना मिळाली. त्यानंतर, गुप्ता यांनी संबंधित अधिकारी व स्टाफची चौकशी करुन माहिती घेतली. त्यावेली, रुग्णालयात बाळासाठीचे बेड शिल्लक असल्याचे समजले. त्यामुळे, जवळपास तीन तासानंतर पुन्हा बीएचयू रुग्णालयातच बाळाला बेड उपलब्ध झाला. 

टॅग्स :Varanasiवाराणसीhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीdoctorडॉक्टर