शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धक्कादायक! करौली हिंसाचारानंतर हिंदूंचं पलायन; घरे आणि दुकानांबाहेर लागले 'मालमत्ता विक्री'चे बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:04 IST

राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सर अथवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे.

जयपूर - रामनवमी आणि नवसंवत्सराच्या दिवशी (2 एप्रिल) देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड आदी राज्यांमध्ये सांप्रदायिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांमध्ये अनेक जण जखमीही झाले. यानंतर, आता या राज्यांत पोलिसांकडून कारवाईही सुरू आहे. अनेकांना अटकही करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील हिंसाचारात सहभागी आरोपींच्या घरांवर आणि दुकानांवर तर बुलडोझर चालवण्यात आले. मात्र, यातच राजस्थानातील करौलीतील हिंसाचारानंतर, हिंदूंच्या पलायनाचे वृत्त आहे.

राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सराच्या दिवशी (भारतीय नव वर्ष) हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे. जागरण डॉट कॉमने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथील मुस्लीम बहूल भागांतून हिंदू आपली घरे आणि दुकाने विकून दुसरीकडे पलायन करत आहेत. दोन घरे आणि काही दुकानांवर तर एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी कब्जा केला आहे. तर, अनेक ठिकाणी हिंदूंनी घराबाहेर आणि दुकानांबाहेर ‘मालमत्ता विक्रीचे’ बोर्ड लवले आहेत. 

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, गेल्या आठवडाभरात येथील लोक आपली घरे आणि दुकाने सोडून एकतर करौलीमध्येच दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले आहेत अथवा घरा-दारांना कुलूप लावून दुसरीकडे निघून गेली आहेत. या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. पलायन करणाऱ्या लोकांत, जाटव, खटीक, धोबी आणि कुमावत समाजातील लोकांचा समावेश आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि प्रदेश भाजपाध्यक्ष सतीश पुनिया बुधवारी करौलीला भेट देणार आहेत.

मंत्री म्हणाले, पलायन झालेच नाही - यासंदर्भात बोलताना राज्य सरकारमधील पंचायत राज मंत्री रमेश मीणा म्हणाले, कसल्याही प्रकारचे स्थलांतर झालेले नाही. यासंदर्भात अफवा पसरवली जात आहे. हिंदूंनी स्थलांतर केलेले नाही. मात्र, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीणा यांनी आतापर्यंत स्थलांतरित झालेल्या 195 जणांची यादी प्रशासनाकडे सोपवली आहे.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानHinduहिंदूMuslimमुस्लीमgudhi padwaगुढीपाडवाNew Yearनववर्ष