नवी दिल्ली - भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांना हुसकावून लावताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मायदेशात सुखरूप परतले आहेत. दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांनी आपले विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी पाकिस्तानच्या एफ - 16 विमानाला पाडल्याचे सांगतले जात होते. दरम्यान अभिनंदन यांच्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या भ्रामक अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन हवाई दलाने केले आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाने फेक अकाऊंट सुरू झाली असून, त्याबाबत हवाई दलाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विंग कमांडर अभिनंदन यांचे ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर कोणतेही अकाऊंट नाही, असेही हवाई दलाने याआधी स्पष्ट केले होते.
विंग कमांडर अभिनंदन यांच्याबाबतच्या अफवांपासून सावध राहण्याचे हवाई दलाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:11 IST