शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! माजी जवानाला बांगलादेशातील घुसखोर ठरवून आसाम पोलिसांनी पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:30 IST

आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली मोहम्मद अजमल हक हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. मात्र आज त्यांना भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागतो आहे. तुम्ही बांगलादेशी घुसखोर नाही, तर भारतीयच आहात, हे सिद्ध करा, असं हक यांना नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

गुवाहाटी - आसाममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षं देशाच्या लष्करात सेवा बजावल्यानंतर आसाम पोलिसांनी एका माजी जवानाला घुसखोर ठरवत नोटीस बजावली आहे. मोहम्मद अजमल हक हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. मात्र आज त्यांना भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागतो आहे.आसाम पोलिसांनी हक यांना बांगलादेशी घुसखोर ठरवत नोटीस बजावून भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. अनेक वर्षं लष्करात ज्युनिअर ऑफिसर म्हणून काम करून ते निवृत्त झाले. मोहम्मद अजमल हक हे गुवाहाटीला वास्तव्याला आहेत. परंतु गेल्या महिन्यात पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीमुळे ते हैराण झाले. पोलिसांनी त्या नोटिशीत त्यांनी भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं होतं. तुम्ही बांगलादेशी घुसखोर नाही, तर भारतीयच आहात, हे सिद्ध करा, असं हक यांना नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.आसाममध्ये बाहेरून म्हणजे खास करून बांगलादेशातून आलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी 100 फॉरनर्स ट्रीब्यूनल्सची स्थापना केली आहे. हक यांना मिळालेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, तुमच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी केस दाखल केली आहे. तुम्ही 25 मार्च 1971नंतर भारतात कोणत्याही कारणाशिवाय घुसखोरी केली आहे. 25 मार्च 1971 रोजीच पाकिस्तानच्या सेनेनं पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेशातील लोकांविरोधात ऑपरेशन सर्चलाइट सुरू केलं होतं. हक यांना बजावलेल्या नोटिशीत 11 सप्टेंबरला न्यायालयासमोर येऊन स्वतःची नागरिकता सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे. परंतु हक यांना ही नोटीसच 11 सप्टेंबरनंतर मिळाली आहे. कारण ही नोटीस त्यांचं गाव कालाहीकशला पाठवण्यात आली होती. कालाहीकश हे गुवाहाटीहून 70 किलोमीटर दूर आहे. आता 13 ऑक्टोबरला हक न्यायाधिकरणासमोर उपस्थित राहणार आहेत. हक हे 1986मध्ये टेक्निशियन म्हणून भारतीय लष्करात भरती झाले होते. विशेष म्हणजे 2012 रोजी हक यांची पत्नी मुमताज बेगम यांना नोटीस पाठवून नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं.