शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:06 IST

Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका कोर्टाने फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात लंडनमध्ये भाषण करताना केलेल्या कथित अवमानकारक उल्लेखांवरून त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झालेला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांच्यावतीने याचिकाकार सात्यकी सावरकर यांच्या आईची वंशावळ मागण्यात आली होती. 

याबाबत न्यायदंडाधिकारी (प्रथण श्रेणी) अमोल शिंदे यांनी सांगितले की, हे प्रकरण कथित आक्षेपार्ह भाषणाशी संबंधित आहे,  हिमानी सावरकर यांच्या वंशावळीशी संबधित नाही. हिमानी सावरकर ह्या महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे याच्या कन्या होत्या.

राहुल गांधी यांच्यावतीने युक्तिवाद करताना मिलिंद पवार यांनी सांगितले की, तक्रारदाराने आपल्या पितृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिली आहे. मात्र मातृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिलेली नाही. ही वंशावळ सुनावणीमध्ये आवश्यक आहे. मात्र कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. तसेच ही माहिती या सुनावणीत आवश्यक नसल्याचे सांगितले.

याबरोबरच  कोर्टाने राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी सात्यकी सावरकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. या खटल्याची सुनावणी १० जानेवारी पासून निश्चित झालेली आहे. मात्र राहुल गांधी हे जाणीवपूर्वक आपला युक्तिवाद नोंदवत नाही आहेत, तसेच उशीर करत आहेत, असा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर