शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शोभा डेंची नको ती टिवटिव, महिला क्रिकेटपटूंवर केले ट्विट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 21:54 IST

वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी वादग्रस्त ट्विट

मुंबई, दि. 2 - वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणाऱ्या शोभा डे पुन्हा एकदा बरळल्या आहेत. यावेळी त्यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंवर ट्विट करुन वाद ओढवून घेतला आहे. महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर अनेकांकडून कौतुक होत आहे. मात्र शोभा डे यांनी 'देवा या हुशार महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिकीकरण व लोभापासून वाचव, त्यामुळे पुरूष क्रिकेटपटू उद्ध्वस्त झाले आहेत' असे ट्विट केले आहे. दरम्यान, शोभा डेंच्या या टवि्टवर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त करत रिट्विट केले आहे. यामध्ये काहीजणांनी शोभा डे सध्या महिला क्रिकेटपटूंच्या निमित्ताने स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. काहींनी  'देवा यूजलेस, वर्कलेस, पेज थ्री स्तंभलेखकांपासून आमच्या क्रिकेटपटूंचे रक्षण कर' असे ट्विट केले आहे. एकाने तर 'महिला क्रिकेटपटूंनी व्यावसायिकीकरण केले तर बिघडले कुठे फक्त पुरूष क्रिकेटपटूंनीच श्रीमंत व्हावे असे तुम्हांला वाटते काय?' असा सवाल केला आहे.  तसेच,  शोभा डे क्रिकेटपटूंशी ईर्षा करतात, त्यांना महिला क्रिकेटपटूंचे एवढे कौतुक झाल्याचे पाहवत नाही, असेही एकाने म्हटले आहे. याचबरोबर, अनेकांनी व्यावसायिकीकरणामुळे कोणत्या क्रिकेटपटूचे करिअर खराब झाले ते तरी सांगा? असा सुद्धा सवाल केला आहे. याआधी सुद्धा अनेकवेळा शोभा डे यांनी वादग्रस्त ट्विट केली आहेत. गेल्या दिवसांपूर्वी शोभा डे यांनी मध्य प्रदेशमधील दौलतराम जोगावत या स्थूल पोलीस अधिका-याचे छायाचित्र पोस्ट करून मुंबई पोलिसांची ट्विटरवर खिल्ली उडविली होती. यावर शोभा डे यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.