शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला केलं 'अरे-तुरे'; शिवराज यांनी कान खेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 13:40 IST

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या मैदानात उतरुन प्रत्येक राजकीय नेता एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या मैदानात उतरुन प्रत्येक राजकीय नेता एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या बोलण्याचालण्यावरही बारीक लक्ष ठेऊन आहेत. याच पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही राहुल गांधींना त्यांची वागण्याची पद्धत जाहीररित्या सांगत त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडासा वेळ काढत येथील प्रसिद्ध '56 दुकान' या खाद्यपदार्थांच्या ठिकाणाला भेट दिली. येथे त्यांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. त्यांच्यासोबत कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधियादेखील होते. यावेळेस राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं कमलनाथ यांना हाक मारली, त्यावरुन शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. 

आईस्क्रीमच्या दुकानात राहुल गांधींनी म्हटले की, 'कमल, आइसक्रीम बहुत अच्छी है, तुम भी खाओ.'  यावरुन शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला. ''आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला ते अशा पद्धतीनं कशी काय हाक मारू शकतात'',असा प्रश्न उपस्थित करत चौहान यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. कमलनाथ यांनी त्यांच्या वडिलांसोबत (राजीव गांधी) काम केले आहे. 70-75 वर्षांच्या व्यक्तीला त्यांच्या नावानं हाक मारणं, ही भारतीय संस्कृती आहे?, असे प्रश्न विचारत चौहान यांनी राहुल गांधींना फटकारलं आहे. 

(राहुल गांधींचा यू-टर्न, म्हणे, शिवराज यांच्या मुलाच्या नावामध्ये कन्फ्युज झालो)

यापूर्वीही चौहान यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता.  चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात राहुल गांधींनी चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडले. राहुल गांधींच्या टीकेमुळे संतप्त झालेले शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. 

दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण कन्फ्युज झाल्याने शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण दिले होते. "मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात होतो.  खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव केली.

सोमवारी राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहानांवर हे आरोप केले होते. मामाजींच्या मुलाचं पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव समोर आले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होते. पाकिस्तानसारख्या देशाने त्यांना तुरुंगात डांबले, परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. दरम्यान, राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. "जर कुणी कनिष्ठ नेत्याने असा आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खुद्द काँग्रेस अध्यक्षानीच अशाप्रकारचे आरोप लावणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले.  

 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rahul Gandhiराहुल गांधीshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान