शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना संघर्ष दिल्लीत पोहोचला! BJP चं शिष्टमंडळ गृहसचिवांची भेट घेण्यासाठी राजधानीत, शिवसेनेची तक्रार करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 09:25 IST

राज्यात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे.

नवी दिल्ली- 

राज्यात सुरू असलेला शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष आता दिल्लीत पोहोचला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर भाजपाचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं आहे. सकाळी सव्वा दहा वाजता हे शिष्टमंडळ भल्ला यांची भेट घेणार आहे. गृह सचिवांकडून भाजपाच्या शिष्टमंडळाता १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. 

किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे. या शिष्टमंडळात किरीट सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे, आमदार मिहीर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह आणि विनोद मिश्रा यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर हे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीआधी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "भाजपाचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरू केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला होतो. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत", असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार स्पॉन्सर्डखार पोलीस स्टेशनच्या आवारात माझ्यावर झालेला हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पॉन्सर्ड हल्ला होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितलं होतं. तरी त्यांनी जबाबदारी घेऊन मला तिथून सुरक्षित बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं. पण गेटमधून बाहेर येताच शिवसेनेचे ७० ते ८० गुंड माझ्या कारवर तुटून पडले होते. माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत मला तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना