शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 06:36 IST

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू,

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू, या सोनिया गांधी यांच्या अटीमुळेच अरविंद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा इथे सुरू आहे.महाराष्ट्रातील शिवसेना व भाजप यांची युती आधीच मोडीत निघाली होती; पण केंद्रातील एनडीएमध्ये शिवसेनेचा सहभाग होता आणि अरविंद सावंत मोदी सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री होते. त्यांचा राजीनामा हा शिवसेनेचे एनडीएशी संबंध तुटल्याचेच द्योतक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची अलीकडेच भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. त्यावेळीच सोनिया गांधी यांनी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, त्यानंतर पाठिंब्यावर विचार करता येईल, असे पवार यांना सांगितले होते. पवार यांनी ही बाब शिवसेना नेते संजय राऊत यांना सांगितली. त्यानंतरच अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास शिवसेनेने सांगितले. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसने लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली नाही.>सोनिया गांधींना दिली माहितीकाँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते सकाळीच दिल्लीत दाखल झाले. अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर व अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. आता आम्ही राज्यात युतीतून आणि दिल्लीत एनडीएतून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. त्यामुळे काँग्रेसने आता आम्हाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विंनती सेना नेत्यांनी अहमद पटेल यांना केली. त्यानंतर अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊ न त्यांना या चर्चेची माहिती दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी