शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

शिवसेना - भाजपाचा जनाधार घटला तर राष्ट्रवादीचा वाढला महापालिका निवडणूक - शिवसेनेचे मताधिक्य १८,२१९ ने घटले * भाजपाची ६२,५७८ मतांची घसरगुंडी

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

नारायण जाधव

नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अंतिम मतदार यादीतील एकूण ८ लाख १५ हजार ६७ मतदारांपैकी ३ लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले. यात सर्वाधिक ५२ जागा मिळविणार्‍या राष्ट्रवादीला १ लाख ५१ हजार ५८२ मते मिळाली असून शिवसेनेला १ लाख ४८३ मते मिळाली आहेत. तर सदस्य नोंदणीत १ लाख २८ हजार सदस्यांची नोंदणी करणार्‍या भाजपाला अवघ्या ३९,१४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मताधिक्य विधानसभेत मिळालेल्या मतांपेक्षा निम्म्याहून अधिक कमी झाले आहे.
* राष्ट्रवादीचे मताधिक्य २१,३१३ ने वाढले
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदार संघातून संदीप नाईक यांना ७६,४४४ तर बेलापूरमधून गणेश नाईक यांना ५३,८२५ अशी एक लाख ३० हजार २६९ मते मिळाली होती. त्यात २१ हजार ३१३ ने वाढ होऊन ती आता महापालिका निवडणुकीत १ लाख ९३ हजार ९७३ झाली आहेत.
* शिवसेनेचे मताधिक्य १८,२१९ ने घटले
तर ऐरोलीतून विजय चौगुले ६७,७१९ आणि बेलापूरमधून विजय नाहटांनी ५०,९८३ असे एक लाख १८ हजार ७०२ मते मिळविणार्‍या शिवसेनेला या महापालिका निवडणुकीत मात्र एक लाख ४८३ मते मिळाल्याने त्यांचे मताधिक्य महापालिका निवडणुकीत १८,२१९ ने घटले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँगे्रसने शिवसेनेला उघडउघड मदत केली होती. ती गृहीत धरली तर महापालिकेत शिवसेनेच्या मताधिक्याचा आकडा आणखी खाली येऊ शकेल.
* भाजपाची तब्बल ६२,५७८ मतांची घसरगुंडी
तसेच विधानसभेत ऐरोलीतून वैभव नाईक यांची ४६,४०५ आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांची ५५,३१६ अशी एक लाख ७२१ मते घेऊन जोषात असलेल्या भाजपाला महापालिका निवडणुकीत अवघी ३९,१४३ मते मिळाली असून त्यांचे मताधिक्य ६२ हजार ५७८ ने घटले आहे.
या निवडणुकीत ९२ जागा लढून १० जागा मिळविणार्‍या काँगे्रसला ४२,४८४ मते मिळाली आहेत. तर अन्य पक्षांना नोटाअंतर्गत मिळालेल्या ५३९१ मतांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. यात नवी मुंबईत ३६ जागा लढविणार्‍या शेकापला मतदारांनी साफ नाकारले असून त्यांना अवघी ४०२९ मते मिळाली आहेत. तर युतीचा घटक पक्ष म्हणून मिरविणार्‍या रिपाइं - ९६१,राष्ट्रीय समाज पक्ष १२३ मिळाली आहेत.