शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने आम्हाला महाराष्ट्रात दगा दिला: पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:12 IST

लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळा

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परविरोधी विचारांची आणि संधीसाधू असून, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेली पन्नास वर्षे स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष आणि स्वत:च्या नेत्याला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने आता अचानक ही भूमिका बदलली आहे, अशी टीका वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.

लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने प्रादेशिक पक्षांचे महत्त्व या विषयावर बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आणि सरकार बनवलेल्या तिन्ही पक्षांचा पराभव झाला. दक्षिण मुंबईत तर कोणीही शिवसेनेला मत देऊ इच्छित नाही. त्या पक्षाने घरोघरी व गल्लीबोळात जाऊ न तुमचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आहे, असे सांगितले होते. त्यामुळे लोकांनी शिवसेनेला मते दिली. यावेळी गोयल यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, एनआरसी आणि आरसेप या विषयांसह देशाच्या आर्थिक भविष्यावरही विचार मांडले.

महाराष्ट्र व हरयाणा यांची तुलना करणे योग्य नाही, असे सांगताना गोयल म्हणाले की, शिवसेनेशी आमची निवडणूकपूर्व युती होती आणि जनतेने या युतीलाच बहुमत दिले. याउलट हरयाणामध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही आणि राज्यात अस्थिरता राहू नये, यासाठी तेथील जेजेपी या पक्षाने भाजपसह सरकार बनवण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर येण्यामागे पंतप्रधान मोदी यांचा देशाला पुढे नेण्याचा संकल्पही त्या पक्षाला महत्त्वाचा वाटला. प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेविषयी रेल्वेमंत्री म्हणाले की, या पक्षांचा विचार केवळ राज्यांपुरता असतो. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सशक्त विचार पुढे नेणाºया राष्ट्रीय पक्षाची देशाला अधिक गरज आहे. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने चंद्रशेखर, देवेगौडा व इंदरकुमार गुजराल यांच्या सरकारचा हवाला देत ते म्हणाले की, प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय स्तरावर कोणतीच जबाबदारी नसते. हे पक्ष केवळ आपल्या नफा व फायद्याचा विचार करून प्रसंगी सरकार पाडतात.

त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांच्या सरकारमध्ये सहभागी करताना, ते सरकार पाडू शकणार नाहीत, अशा स्थितीतच महत्त्व द्यायला हवे. त्यांना सरकारमध्ये खूपच महत्त्वाचे स्थान मिळाल्याने यूपीए सरकारमध्ये कसे घोटाळे झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. हे घोटाळे बाहेर आले, तेव्हा तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आघाडी सरकार चालवण्यातील या समस्या आहेत.‘लोकमत संसदीय पुरस्कार वितरण’ सोहळ्यानिमित्त ‘भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल, एआयएमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विविध विषयांवर परखड मते व्यक्त केली.

भाजपच्या विजयाचे प्रमाण ७0 टक्के

महाराष्ट्रात शिवसेनेने लोकभावनेचा अपमान केला, अशी टीका गोयल यांनी केली. ते म्हणाले की, निवडणूकपूर्व युती असताना शिवसेनेने आपल्या ३५ वर्षांपासूनच्या मित्रपक्षाशी संबंध तोडले. राज्यात भाजपच्या विजयाचे प्रमाण ७0 टक्के असून आम्ही १0५ जागा जिंकल्या.च्याउलट शिवसेनेचे विजयाचे प्रमाण ४0 टक्के असून, त्यांना ५४ जागी विजय मिळाला. भाजपमुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार विजयी झाले. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली असती, तर आम्ही स्वत:चे सरकार बनवू शकलो असतो. पण आम्ही युतीच्या धर्माचे पालन केले. त्या बदल्यात असा दगा दिला जाईल, असे आम्हाला वाटले नव्हते.

टॅग्स :Lokmatलोकमतpiyush goyalपीयुष गोयलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा