शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:07 IST

नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर शिवसेना-भाजपचे नगरसेवक वेगळ््या वाटांनी सहलीवर गेले.

अहमदनगर : नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी झाल्यानंतर शिवसेना-भाजपचे नगरसेवक वेगळ््या वाटांनी सहलीवर गेले. भाजपचे सर्व नगरसेवक नाशिक येथूनच सहलीवर रवाना झाले. शिवसेनेचे निम्मे नगरसेवक सहलीवर तर निम्मे नगरसेवक नगरमध्ये परतले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बसपासह अपक्ष नगरसेवकही मंगळवारी सायंकाळपर्यंत नगरमध्येच होते. सेना-भाजपच्या नगरसेवकांनी वेगळ््या वाटा धरल्याने त्यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गटनोंदणी झाल्यानंतर इतर नगरसेवक नगरमध्ये असताना भाजपला नेमकी कोणाची भीती आहे? याबाबत संशय निर्माण झाला आहे.शिवसेना, भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेस गट नोंदणी करणार की नाही? हे बुधवारी स्पष्ट होईल. बहुजन समाज पक्षाचे चार नगरसेवकही त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. महापौरपदासाठी सरसावलेल्या भाजपने त्यांचे सर्व १४ नगरसेवक गटनोंदणीनंतर नाशिक येथून सहलीवर रवाना झाले आहेत.कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती आहे. कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार याचे वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. ६८ पैकी सर्वाधिक २४ जागा मिळविणारी शिवसेना भाजपशी (१४) युती करण्याबाबत सध्यातरी तयार नाही. शिवाय सेनेला पाठिंबा देण्याची भाजपची तयारी नाही. वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा नसल्याने स्थानिक भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचा महापौर झाल्यास शहराच्या विकासाला तीनशे कोटी रुपये मिळतील, याच एका मुद्द्यावर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी संजय शेंडगे हेच शिवसेनेचे गटनेते होते. ते सेनेसोबत एकनिष्ठ राहिले. यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे निवडून आल्या. सर्वात विश्वासू नगरसेवक म्हणून पुन्हा त्यांच्यावरच गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मालन ढोणे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका असून खा. दिलीप गांधी यांच्या गटातील व भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया धनंजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रिया या माजी नगरसेवक व माजी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धनंजय जाधव यांच्या पत्नी आहेत. जाधव हेही अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. महापालिकेतील काँग्रेसच्या पाचही जागा डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या आदेशानेच सुप्रिया यांची गटनेतेपदी निवड झाली.शिवसेनेच्या गटनेतेपदी रोहिणी संजय शेंडगे, भाजपच्या गटनेतेपदी मालन ढोणे आणि काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया जाधव यांची निवड करण्यात आली. गतवेळी संजय शेंडगे (सेना), दत्ता कावरे (भाजप), संदीप कोतकर (काँग्रेस), समद खान (राष्ट्रवादी), गणेश भोसले (मनसे) असे गटनेते होते. शिवसेना वगळता इतर सर्वच पक्षात गटनेतेपदाचे वाद होते. नंतरच्या टप्प्यात सुवेंद्र गांधी (भाजप), संपत बारस्कर (राष्ट्रवादी), सुवर्णा कोतकर (काँग्रेस), वीणा बोज्जा (मनसे) यांची पक्षातील नगरसेवकांनी गटनेते म्हणून निवड केली. मात्र हे गटनेते महापालिका प्रशासनाने शेवटपर्यंत ग्राह्य धरले नव्हते. तरीही राजकीय फायद्यासाठी गटनेतेपदाचे पत्र घेऊन पक्षांतर झाले. त्यामुळे यावेळी सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेत विश्वासू नगरसेवकाला गटनेतेपद दिले आहे. आता राष्ट्रवादी, बसपा हे कोणाला गटनेता करणार हे बुधवारी स्पष्ट होईल.बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांची बुधवारी गटनोंदणी होणार आहे. त्यांचाही गट स्वतंत्र असेल. सचिन जाधव आणि मुदस्सर शेख यांच्या नेतृत्त्वाखाली हा गट कार्यरत आहे. सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव किंवा शेख यांच्यापैकी एक गटनेता होऊ शकेल. ज्याचा महापौर त्याला पाठिंबा, असे बहुजन समाज पक्षाच्या या चारही नगरसेवकांचे धोरण दिसते आहे. गटनोंदणी झाल्यानंतर आणि राजकीय कल पाहून हा गट निर्णय घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर