शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena: लोकसभा सचिवांकडून पक्षपात, शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीवर शिवसेनेचा तीव्र आक्षेप, विनायक राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 11:31 IST

Shiv Sena: शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप सुरू असून, सेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील १२ खासदारांचा गटही शिंदेगटात दाखल झाला आहे. दरम्यान, या गटाने राहुल शेवाळे यांना आपले गटनेते आणि भावना गवळी यांना आपल्या प्रतोद म्हणून नियुक्त करण्याची विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर या नियुक्तीला मान्यताही मिळाली होती. मात्र आता शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच लोकसभा सचिवांकडून अन्याय झाल्याचा आरोप करत त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या आमच्या दोन्ही पत्रांची दखल न घेता नव्या गटनेत्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.  नियुक्तीचं हे पत्र पोर्टलवर २० तारखेला आलं आहे. मात्र आम्हाला ते १९ तारखेला वाचायला मिळालं. तर लोकसभेतील जागांच्या तरतुदीच्या पत्रावर १८ तारीख नमूद आहे. नियुक्तीचं पत्र १९ तारखेला काढलं आणि त्याची अंमलबजावणी १८ तारखेपासून झालेली आहे. आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. जर त्यांना आमची दखल न घेता निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी जेव्हा पत्र दिला तेव्हापासूनच मान्यता द्यायला हवी होती. याबाबत आम्ही लेखी तक्रार करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

आमचा गटनेता निवडण्याचा अधिकार फक्त शिवसेना पक्षप्रमुखांना आहे. आता अत्यंत घाईने गटनेता नियुक्त करण्यात आला आहे. आम्ही दिलेल्या पत्रांची दखल घेऊन आमची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. मात्र एकतर्फी निर्णय घेत लोकसभा कार्यालयाने आमच्यावर अन्याय केला आहे, असं आमचं मत आहे. लोकसभा सचिवांच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेणार आहोत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.   

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाVinayak Rautविनायक राऊत