शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:11 IST

दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

 नवी दिल्ली - सुशील मोदी ना घरचे ना घाटचे. ते शिवसेनेवर टीका करतात ते हास्यास्पद. भाजपा केवळ विरोधी पक्षांवर नाही तर सोबत असणाऱ्या पक्षांनाही संपवण्याचा घाट घालतं. सत्तेच्या नादात भाजपा मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतं. शिवसेनेला मराठी माणसाने बनवली आहे. कुणीही शिवसेना संपवू शकत नाही. जे टीका टिप्पणी करतात त्यांनी शिवसेना काय आहे ते समजून घ्यावं नाहीतर राज्यात त्यांचे हसू होईल अशा शब्दात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, शिवसेना एकच आहे. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. भाजपासोबत जे आहेत ती ज्युनिअर भाजपा आहे. त्यांनी कितीही म्हटलं खरी शिवसेना आम्ही तरीही शिवसैनिक, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. संविधान त्यांना त्यांची जागा दाखवेल असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

तसेच शरद पवार म्हणाले तेच खरे आहे. दोन तृतीयांश बहुमत असले तरी शिवसेना मूळ पक्ष त्यांचा असू शकत नाही. घटनेच्या १० व्या सूचीनुसार दुसऱ्या गटाला विलीन व्हावेच लागेल. शिंदे गटाने छोटा भाजपा, मोठा भाजपा यात अंतर ठेवू नये. एकच भाजपा बनवावी. शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण असावं हे शिवसैनिक ठरवतील ४० आमदार ठरवू शकत नाही. त्यांना वेगळा पक्ष काढावा लागेल. वेगळे चिन्ह घ्यावे लागेल असंही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. 

दरम्यान, जर कुणावर आरोप लागले असतील तर चौकशी व्हायला हवी. संजय राठोड यांच्यावर आरोप होते म्हणून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. मग भाजपाने ज्यांच्यावर आरोप लावले त्यांनाच मंत्री बनवले ही नैतिकता आहे का? आता महाराष्ट्र सरकारचं महत्त्वाचे खातेही राठोडांना द्यावं. १२ तारखेच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत विचारला असतं हे सरकार पडणार असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 

बाळासाहेब ठाकरेंचं नाव का नाही घेतलं? बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? ठाकरे घराण्याने तुम्हाला सगळं दिलं. त्यांनी एखादवेळेस पद घेतले त्याचा आनंद व्हायला हवा होता. अडीच वर्ष सहन करू शकला नाहीत. तुमच्या ईडीच्या कारवाया, खोटं बोलायचं. गैरव्यवहार त्यातून काढलेली पळवाट आहे अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा