नवी दिल्ली - वॉईस ऑफ द पीपल पार्टीचे शिलांग येथील खासदार रिकी एजे सिंग्कोन यांचं गुरुवारी दुर्दैवी निधन झाले. १९ फेब्रुवारीला संध्याकाळी मैदानात फुटबॉल खेळताना खासदार रिकी एजे खाली कोसळले आणि त्यांची तब्येत ढासळली. खासदार रिकी एजे सिंग्कोन यांच्या मृत्यूनंतर मेघालयात शोककळा पसरली आहे. सिंग्कोन गुरुवारी संध्याकाळी मावलाई मावियोंग येथील एका मैदानात मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते.
माहितीनुसार, रिकी एजे सिंग्कोन मैदानात खेळताना अचानक खाली कोसळले. त्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ मावियोंगच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु त्यावेळी या केंद्रावर डॉक्टर हजर नव्हते म्हणून खासदारांना हायर सेंटरला हलवण्यात आले. त्यानंतर तिथून आधुनिक उपचारांसाठी डॉ. एच गॉर्डन रॉबट्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु खासदार रिकी एजे यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. त्यांना खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मेघालयचे मुख्यमंत्री के संगमा यांनी ट्विट करून खासदारांच्या निधनावर शोक व्यक्त केला. शिलांग येथील खासदार डॉ. रिकी एजे सिंग्कोन यांच्या आकस्मित निधनाने मी अत्यंत स्तब्ध आणि दुखी आहे. डॉ. रिकी हे एक समर्पित आणि दयाळू नेते होते ज्यांना समाजसेवेची खूप आवड होती आणि त्यांची लोकांप्रती अढळ वचनबद्धता होती. ते एक श्रद्धाळू माणूस होते. त्यांनी नम्रता, दूरदृष्टी आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिक इच्छेने सेवा केली. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि असंख्य हितचिंतकांना माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, या घटनेनंतर लगेचच मेघालयचे उपप्रमुख प्रेस्टोन टायनसॉन्ग आणि व्हीपीपी प्रमुख अर्डेट एम. बसयावमोइट यांच्यासह अनेक राजकीय नेते रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु खासदार रिकी यांना वाचवता आले नाही. विद्यमान खासदाराच्या अचानक मृत्यूने मेघालयातील लोकांना धक्का बसला आहे. अनेक नेते आणि समर्थकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
Web Summary : Shillong MP Ricky AJ Syngkon of the Voice of the People Party died after collapsing while playing football. He was rushed to the hospital but could not be saved. Heart attack suspected. Meghalaya mourns the loss of the dedicated leader.
Web Summary : वॉयस ऑफ द पीपल पार्टी के शिलांग सांसद रिकी एजे सिंग्कोन का फुटबॉल खेलते समय गिरने से निधन हो गया। उन्हें अस्पताल ले जाया गया पर बचाया नहीं जा सका। दिल का दौरा पड़ने की आशंका है। मेघालय में शोक की लहर है।