शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! तिकिट न मिळाल्याने नाराज झाला काँग्रेस नेता; थेट CM हेल्पलाईनवर केली तक्रार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:12 IST

Congress News : काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते 1972 पासून काँग्रेससाठी काम करत आहेत. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेले नाही.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील सीएम हेल्पलाईनवर एक अनोखी तक्रार समोर आली आहे. श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभेतील एका काँग्रेस नेत्याने आता थेट सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली आहे. काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते 1972 पासून काँग्रेससाठी काम करत आहेत. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेले नाही. याचा व्हिडीओही त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. सीएम हेल्पलाईनवर प्रत्येकाच्या समस्या सोडवल्या जातात असं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

"मी तक्रार केली आहे, माझी तक्रारही सोडवली जावी. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन संधी द्यावी" असं असे गर्ग म्हणाले. जेणेकरून ते परिसरातील जनतेची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतील. काँग्रेस नेत्याने सीएम हेल्पलाईनवर केलेली ही अनोखी तक्रार सोशल मीडिया फेसबुकवरही शेअर केली आहे. त्यामुळे जिल्हाभरात याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग हे श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभेत राहतात. येथून काँग्रेसचे दिग्गज नेते, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले राम निवास रावतही येतात. रावत यांचा गेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार सीताराम आदिवासी यांच्याकडून पराभव झाला होता. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कोणत्याही परिस्थितीत कापणे अवघड दिसत आहे. अशा परिस्थितीत सीएम हेल्पलाईनवर तिकिटांची मागणी निश्चितच चर्चेत आली आहे. 

काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग म्हणतात की त्यांनी सीएम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली कारण प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्नही सुटणार आहे. यांच्या या तक्रारीनंतर अनेक चर्चा रंगत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे बृजमोहन गर्ग यांनी या व्हिडिओद्वारे आपली तक्रार सोडवण्याचे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारण