शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ला करायचेय ‘मोदीं’सोबत लग्न, एक महिन्यापासून करतेय धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 08:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे.

ठळक मुद्देमला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. असे म्हणत गेल्या एक महिन्यापासून एक महिला दिल्लीत धरणे धरुन बसली विशेष म्हणजे पहिल्या लग्नापासून तिला 20 वर्षांची मुलगी आहे. जयपूर मधील रखोडा गावात राहणाऱ्या शांती शर्मा यांच्याकडे मोठा जमिन जुमला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. असे म्हणत गेल्या एक महिन्यापासून एक महिला दिल्लीत धरणे धरुन बसली आहे. त्या महिलेचे नाव ओम शांती शर्मा असे असून ती 40 वर्षांची आहे. विशेष म्हणजे पहिल्या लग्नापासून तिला 20 वर्षांची मुलगी आहे. 

राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने तिथे यापुढे आंदोलनाला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्यानंतर येथे धरणे आंदोलन करणारी ओम शांती शर्मा समोर आली. 

राजस्थान जयपूर येथे राहणाऱ्या ओम शांती शर्मा (40) या 8 सप्टेंबरपासून जंतरमंतरवर धरणे धरुन बसल्या आहेत. मोदींना आवाहन करणारे एक मोठे पोस्टर घेऊन ती तेथे बसली आहे. त्यात तिने आपली मोदींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदीजी एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. मी जेव्हापासून इथे बसलेय लोक माझ्यावर हसतात, माझी मस्करी करतात पण मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. मला मोदींशी लग्न करायचे आहे. ते देशाची सेवा करतात मला त्यांची सेवा करायची आहे. ते जोपर्यंत इथे येऊन माझी भेट घेत नाहीत तोपर्यंत मी इथे अशीच बसून राहणार. असे ओम शांती शर्मानं इंडिया टुडेला सांगितले. 

माझे आधी लग्न झाले होते. मात्र तो संसार फार काळ चालला नाही. माझ्या नवऱ्याने मला फसविले.  गेली अनेक वर्षे मी एकटीच आहे. फक्त मोदीच माझे दुःख समजू शकतात. मी लग्नाच्या अनेक प्रस्तावांना नकार दिला आणि आता मला मोदींशी लग्न करायचे आहे. जयपूरमध्ये माझ्या मालकीची खूप जमीन आहे. त्यातील काही भाग विकून मोदींसाठी भेटवस्तू घेण्याची माझी इच्छा आहे. असेही तिने सांगितले. 

जयपूरमध्ये वीस एकर जमीनजयपूर मधील रखोडा गावात राहणाऱ्या शांती शर्मा यांच्याकडे मोठा जमिन जुमला आहे. त्यांच्या नावावर तब्बल वीस एकर जमिन, दोन घरं आहेत मात्र ते सगळं सोडून त्या मोदींशी लग्न करण्यासाठी  उघड्यावर येऊन राहत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJantar Mantarजंतर मंतर