ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १६ - आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनी शुक्रवारी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतल्यानंतर शाझिया इल्मी आज भाजपाच्या कार्यालयात जावून भाजपाध्यक्ष्य सतीश उपाध्याय यांच्या उपस्थित प्रवेश घेतला. भाजपाचे सदस्य स्वीकारल्यानंतर शाझिया इल्मी म्हणाल्या की, आपण आजन्म भाजपात राहण्यासाठी प्रवेश घेतला असून दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नाही. माझ्या या इच्छेचा भाजप स्वीकार करेल अशी आपल्याला आशा आहे असे शाझिया इल्मी म्हणाल्या. काल गुरूवारी आपच्या माजी नेत्या आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. बेदी यांच्या प्रवेशाच्या दुस-याच दिवशी शाझिया यांच्यासारख्या बडया महिला नेत्याला भाजपाने आपल्या पक्षात घेतल्याने दिल्ली विधानसभासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणुकींच्या मैदानात उतरणार असल्याचा इशारा आपच्या अरविंद केजरीवाल यांना दिला आहे.
शाझिया इल्मी भाजपात
By admin | Updated: January 16, 2015 16:54 IST