शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Shatrughan Sinha on PM : "पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, मी आसनसोलमधून का नाही?": शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:57 IST

Shatrughan Sinha on PM : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आणि बाबुल सुप्रियो यांना बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसची उमेदवारी दिली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. यानंतर, भाजपकडून या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा ठपका तृणमूलवर ठेवण्यात आला. त्यावर आता स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये मीडियासाठी संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ''बंगालच्या विकासासाठी नेहमीच उभे राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नावावर आसनसोलचे मतदार नला मतदान करतील, असा मला विश्वास आहे. पंतप्रधानांसारख्या राष्ट्रीय व्यक्तीला इतर ठिकाणाहून निवडणूक लढवणे मान्य असेल तर माझ्यासाठीही तेच असले पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातचे असून, वाराणसीतून निवडणूक लढवतात, त्यांना कुणी काही म्हणत नाही," असे सिन्हा म्हणाले.

भाजपकडून शत्रुघ्न सिन्हांचा विरोधसुकांता मजुमदार आणि अग्निमित्र पॉल यांसारख्या बंगालच्या भाजप नेत्यांनी सिन्हा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शत्रुघ्न सिन्हांना राज्याबाहेरचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले आहे. आसनसोल लोकसभा आणि बालीगंगे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  एप्रिलला मतदान होणार आहे, तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

शुत्रघ्न सिन्हांना लोकसभा तर बाबुल सुप्रियोंना विधानसभेची उमेदवारीतृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आणि बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBabul Supriyoबाबुल सुप्रियोtmcठाणे महापालिका