शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

Railway fined: तक्रारीनंतरही 'शताब्दी एक्स्प्रेस'चा AC दुरूस्त न करणं पडलं महागात; रेल्वेला बसला 'इतका' मोठा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 16:14 IST

अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना काही गोष्टींमध्ये बिघाड असल्याचे दिसून येते.

Shatabdi express Railway fined: शताब्दी एक्स्प्रेसमध्ये एसीचा झालेला बिघाड रेल्वे प्रशासनाला चांगलाच महागात पडला. या प्रकरणी रेल्वेला भरभक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. एका प्रवाशाने तक्रार केल्यानंतरही ट्रेनमधील एसी दुरुस्त न केल्याबद्दल त्याने दिल्ली ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. आयोगाचे सदस्य राजन शर्मा आणि बिमला कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम ३ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, ग्राहक मंचांना रेल्वे विरुद्धच्या ग्राहकांच्या तक्रारींवर विचार करण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर आयोगाने उत्तर रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या वतीने उत्तर जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वेला लावण्यात आलेल्या दंडाविरोधात दाखल केलेले अपीलही फेटाळले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले.

रेल्वेला बसला किती रूपयांचा दंड?

प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीच्या तक्रारींची दखल घेण्याचा अधिकार ग्राहक मंचाला नसल्याचा युक्तिवाद रेल्वेकडून करण्यात आला होता. या युक्तिवादानंतरही ग्राहक मंचाच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली तसेच प्रवाशांनी रेल्वे क्लेम ट्रिब्युनलकडे तक्रार करावी, असेही रेल्वेने सांगितले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यानंतर रेल्वेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यासोबतच तक्रारदाराला १० हजार रुपये नुकसान भरपाई खर्च देण्यासही सांगण्यात आले.

गोव्यातही रेल्वे प्रशासनावर नाराजी

गोव्यातील वेल्साव गावातील स्थानिकांनी रेल्वेवर त्यांच्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) वेल्साव गावात 260 मीटर लांबीचा सर्व्हिस ट्रॅक बांधत आहे. ज्या जमिनीवर हे बांधकाम केले जात आहे ती आपली खासगी जमीन असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्याच वेळी, आरव्हीएनएलचे म्हणणे आहे की हे बांधकाम रेल्वेच्या मालकीच्या मालमत्तेत केले जात आहे, जे सध्याच्या रेल्वे ट्रॅकपासून सुमारे १० मीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) ने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साइड ट्रॅकचे बांधकाम पुन्हा सुरू केले, ज्याने यापूर्वीही वाद निर्माण केला होता. बांधकामाचे काम बंद पडले. मात्र, शुक्रवारी गोवा पोलिसांच्या संरक्षणात आरव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांनी एका रहिवाशाने नुकतीच बांधलेली कंपाउंड वॉल तोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला. त्यांच्याच जमिनीवर बांधलेले ते बांधकाम होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे