शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लाल बहादूर शास्त्रीजींनीही घेतले होते पीएनबीचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:18 IST

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कारसाठी घेतलेले पाच हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या निधनानंतर पत्नी ललिता यांनी निवृत्तीवेतनातून परत केले होते. ही माहिती त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनी दिली.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेले कित्येक करोडोंचे कर्ज नीरव मोदी परत करेल की नाही हे माहीत नाही, पण या बँकेकडून दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कारसाठी घेतलेले पाच हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या निधनानंतर पत्नी ललिता यांनी निवृत्तीवेतनातून परत केले होते. ही माहिती त्यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांनी दिली.अनिल शास्त्री म्हणाले की, आम्ही सेंट कोलंबिया शाळेत टांग्यातून गेलो. फक्त एकदाच आम्ही कार्यालयाची कार वापरली. कोणत्याही खासगी कामासाठी कार वापरायला माझ्या वडिलांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही कार विकत घ्यावी, अशी घरच्यांची इच्छा होती. ते म्हणाले की, १९६४ मध्ये पंतप्रधानांचे विशेष सहायक व्ही. एस. वेंकटरामन यांनी केलेल्या चौकशीतून नव्या फियाट कारची किमत १२ हजार रूपये असल्याचे शास्त्री कुटुंबीयांना समजले. कुटुंबाकडे बँकेत सात हजार रूपयेच होते. त्यामुळे पंतप्रधानांनी पाच हजार रूपये कर्जासाठी अर्ज केला व ते मंजूरही झाले. मात्र ११ जानेवारी, १९६६ रोजी शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये निधन झाले. नंतर ते कर्ज तसेच राहिले. वडिलांच्या निधनामुळे माझ्या आईने त्याची परतफेड पेन्शनमधून केली होती.ती कार (क्रमांक डीएलई ६) १९६४ च्या मॉडेलची होती. आता ही कार लाल बहादूर शास्त्री स्मारकात ठेवण्यात आली आहे. पंजाबनॅशनल बँकेची स्थापना १८९४ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत स्वदेशीबँक हवी, या उद्देशाने झालीहोती. सुरुवातीला बँकेच्या संचालकांत लाला लजपत रायहोते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोठे योगदान होते.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा