शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:39 IST

राजकारणात परतण्याचे संकेत : पक्षाची वाताहात बघवत नाही

चेन्नई : वर्षभरापूर्वी अद्रमूकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांनी अद्रमूक पक्षावर पुन्हा ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून, यातून त्या पुन्हा राजकारणात परतण्याचे संकेत मिळतात. अंतर्गत भांडणामुळे पक्षाची होणारी वाताहात मी पाहू शकत नाही. लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले.दिवगंत जे. जयललिता यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू राहिलेल्या शशिकला यांनी आपल्या दोन निष्ठावंत नेत्यांशी फोनवरून केलेले संभाषण जाहीर झाले आहे. यातून त्या पुन्हा राजकारणात परतणार असल्याचे संकेत मिळतात. या संभाषणाच्या पहिल्या ध्वनिफितीत ‘आम्ही निश्चितच पक्षाची घडी नीट बसवू, याची खात्री आहे. मी येत आहे’, असे म्हणत असल्याचे ऐकू येते. दुसऱ्या ध्वनिफितीत त्या अद्रमूकच्या संदर्भाने आपल्या समर्थकांना म्हणतात की, पक्ष उभारणीसाठी माझ्या पक्ष नेत्यांनी खूप मेहनत घेतली. नेत्यांतील पक्षांतर्गत कलह पाहून मी दु:खी आहे. पक्षाची वाताहात होताना मी निमूट राहू शकत नाही.कोरोना साथीची दुसरी लाट कमी झाल्यानंतर मी येईन आणि समर्थकांना भेटणार आहे. पक्ष पुन्हा चांगल्या स्थितीत आणला जाऊ शकतो. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. लवकरच चांगला निर्णय होईल आणि मी पुन्हा परत येईन, असे त्या म्हणत असल्याचे ध्वनिफितीत ऐकू येते. यातून शशिकला यांनी अद्रमूकवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे संकेत मिळतात. यावर अद्रमूकचे प्रवक्ते आणि पक्षाच्या कायदा समितीचे प्रदेश सह-सचिव आर. एम. बाबू मुरुगवेल म्हणाले की, त्यांच्या टिप्पणीशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. 

टॅग्स :All India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम