शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shashi Tharoor : पुरुष खासदारांसह फोटो शेअर करत शशी थरुर म्हणाले, "आता हा व्हायरल होणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:32 IST

Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे कायमच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे कायमच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात. थरूर यांनी सोमवारी महिला खासदारांसोबत ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये महिला खासदारांसह ते हसताना दिसत आहेत. परंतु त्यांनी या फोटोसोबत त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर थरूर यांना माफीही मागावी लागली होती. यानंतर आता त्यांनी पुरुष खासदारांसोबत एक सेल्फी शेअर केला आहे.

दरम्यान, थरूर यांनी महिला खासदारांसह शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनवरून वाद निर्माण झाला होता. "कोण म्हणतं लोकसभा काम करण्यासाठी एक आकर्षक जागा नाही," असं त्यांनी फोटोसह लिहिलं होतं. यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्या या कॅप्शनवरून निशाणा साधण्यात आला होता. अनेकांनी केलेल्या टीकेनंतर थरूर यांना माफीही मागावी लागली होती. "फोटोवरून काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या याबाबत आपण माफी मागतो," असं त्यांनी नमूद केलं होतं. महिला खासदारांच्या सांगण्यावरून हा सेल्फी काढण्यात आला होता आणि आनंदी वातावरणात हा फोटो काढण्यात आला. त्यांच्या परवानगीनंतरच हा फोटो ट्वीट केल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर त्यानी मंगळवारी पुरूष खासदारांसोबत फोटो शेअर केला. यात त्यानी तीन सेल्फी पोस्ट केले. हे व्हायरल होण्याची आशा नाही, असं त्यांनी कॅप्शन देताना म्हटलं. परंतु यानंतरही काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरParliamentसंसदTwitterट्विटर