शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे अनेक पर्याय...', शशी थरुर यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:32 IST

Shashi Tharoor: पुढील वर्षी होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशी थरुर यांचे विधान महत्वाचे आहे.

Shashi Tharoor: 2014 साली देशात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसची गळती अजून सुरुच असून, यात वाढ होण्याची शक्यता आहे. यातच आता तिरुअनंतपुरमचे खासदार आणि दिग्गज काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस हायकमांडची झोप उडू शकते. 'काँग्रेसला माझी गरज नसेल, तर माझ्याकडे इतरही कामे आहेत,' असे थरुर यांनी म्हटले आहे. 

मला अनेक पर्याय खुलेमल्याळम पॉडकास्टमध्ये इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना शशी थरुर यांनी मोठे वक्तव्य केले. थरूर 2026 मध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होते. या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गरजांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे की, केरळमध्ये नेतृत्व स्वीकारण्यात मी इतरांपेक्षा खूप पुढे आहे. काँग्रेस पक्षाला माझा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपस्थित राहीन. जर त्यांना माझी गरज नसेल, तर मला इतरही कामे आहेत. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे तुम्ही समजू नका, असे सूचक विधान शशी थरुर यांनी केले. 

केरळ काँग्रेसला नेत्याची गरजथरुर पुढे म्हणतात, सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि केरळ काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विनंतीवरुन मी अमेरिकेतील आरामदायी जीवन सोडले आणि पूर्णवेळ राजकारणात उतरलो. ही माझी जबाबदारी नाही, पण मी याकडे पक्षाचे लक्ष वेधले आहे. केरळ काँग्रेसमध्ये नेत्याची कमतरता असल्याचेही अनेक कार्यकर्त्यांना वाटते. यूडीएफमधील काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही मला हे सांगितले आहे. तिरुअनंतपुरममधील माझे आवाहन पक्षापेक्षा खूप मोठे आहे. लोकांना माझी बोलण्याची आणि वागण्याची पद्धत आवडते. काँग्रेसच्या विरोधात असलेले लोकही मला मत देतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीKeralaकेरळ