शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 14:02 IST

राम मंदिरसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

नवी दिल्ली- राम मंदिरसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे. हिंदू लोक अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधलं जावं, असं वाटणार नाही. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018''मध्ये शशी थरूर बोलत होते. त्यानंतर भाजपानंही शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये, यासाठी काँग्रेस नेते असं वादग्रस्त विधानं करत असतात. ते जाणूनबुजून एका समुदायाला संदेश देऊ इच्छितात की, राम मंदिर पुनर्निर्माण होऊ नये, असं भाजपा नेते नरसिंहा म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांनी शशी थरूर यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तर विश्व हिंदू परिदषेचे सुरेंद्र जैन यांनी शशी थरूर यांच्या विधानावर टीका केली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला चुचकारण्यासाठीच काँग्रेस नेते अशी विधानं करतात. 

 'द पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर' हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले. याच पुस्तकासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी अशा एका इंग्रजी शब्दाचा वापर केला होता, जो पाहता केवळ त्याचा अर्थ समजणं तर दूरच राहिले. साधा त्याचा उच्चार करणंदेखील युजर्सना कठीण झालंय. परिणामी, या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी युजर्सनी डिक्शनरीची मदतही घेतली. पण उपाय शून्यच कारण याचा अर्थ काही केल्या सापडेना. अखेर युजर्संनी थरुर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.  'तुम्ही वापरलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरीची मदत घेत आहोत', असे ट्विट करत नेटीझन्स थरुर यांना ट्रोल केले होते. विशेष म्हणजे कोणत्याही डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ मिळत नाहीय. पंतप्रधान मोदींसंदर्भात ट्विट करत त्यांनी floccinaucinihilipilification ( फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन) या शब्दाचा वापर केला होता.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर