तिरुवनंतपुरम - काही मुद्द्यांवरील माझी भूमिका भाजपचे समर्थन करणारी नव्हे तर सरकारचे, देशाचे समर्थन करणारी आहे, असे काँग्रेसचे नेते व लोकसभा खासदार शशी थरूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही आंतरराष्ट्रीय विषयांवर मी नेहमीच राजकारणापेक्षा देशाविषयी बोलणे अधिक पसंत केले आहे.
थरूर यांनी सांगितले की, मी संसदेत नेहमीच पक्षाच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. तसेच मी काँग्रेसमध्ये राहणार आहे. अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी केरळमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होणार असून, युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या विजयासाठी काम करेन. थरूर यांनी, राहुल गांधी हे एक सच्चे नेता आहेत. देशातील सांप्रदायिकतेसारख्या विविध मुद्द्यांवर ते जोरदार आवाज उठवत असतात. देशात द्वेष पसरविणाऱ्यांच्या विरोधात ते सातत्याने बोलतात. त्यामुळे ते सर्वांना आवडतात. राहुल गांधी हे एक प्रामाणिक नेता आहेत, असेही म्हटले.
Web Summary : Shashi Tharoor clarified his stances support India, not the BJP. He prioritizes the nation on international matters. He affirmed his commitment to Congress, Kerala election campaigning, and praised Rahul Gandhi as a sincere leader against communalism.
Web Summary : शशि थरूर ने स्पष्ट किया कि उनका रुख भारत का समर्थन करता है, भाजपा का नहीं। वे अंतरराष्ट्रीय मामलों पर राष्ट्र को प्राथमिकता देते हैं। उन्होंने कांग्रेस, केरल चुनाव प्रचार के प्रति अपनी प्रतिबद्धता की पुष्टि की और राहुल गांधी को सांप्रदायिकता के खिलाफ एक ईमानदार नेता बताया।