शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःहून ओटीपी दिला, आता बँकेला दोष देऊ नका; फसवणूक झालेल्या ग्राहकाची तक्रार फेटाळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:26 IST

Cyber Fraud: ग्राहकानेच निष्काळजीपणा केल्याचे नमुद करत सव्वा लाखांच्या फसवणुकीची तक्रार ग्राहक आयोगाने फेटाळली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: ऑनलाइन फसवणुकीत तब्बल १.२५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावलेल्या मुंबईतील एका रहिवाशाने दाखल केलेली तक्रार ग्राहक आयोगाने  फेटाळली. तक्रारदाराने स्वत:च फसवणूक करणाऱ्यांना वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) दिला. त्यामुळे या प्रकरणात ग्राहकाचा निष्काळजीपणा अधोरेखित होतो, अशा परिस्थितीत बँकेला दोष देता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग (उपनगर)चे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्य गौरी एम. कापसे यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात तक्रारदार फसवणुकीला बळी पडल्याचे स्पष्ट केले. मात्र, आरबीआयने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यानुसार ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असल्यास संपूर्ण नुकसान ग्राहकानेच सहन करावे, असे आयोगाने नमूद केले. 

जानेवारी २०२२ मध्ये नेटफ्लिक्सचे सदस्यत्व नूतनीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ई-मेलद्वारे आलेल्या एका लिंकवर त्याने क्लिक केले. तो ई-मेल नेटफ्लिक्सकडून आलेला नाही, हे त्याच्या लक्षात आले नाही. त्याने त्या लिंकवर क्लिक करून आपली कार्डची माहिती व एचडीएफसीबँकेकडून आलेला ओटीपी भरला. काही सेकंदांतच बँकेकडून १,२५,६६५ रुपयांच्या व्यवहाराची पुष्टी करणारा एसएमएस  मिळाला. नेटफ्लिक्सचे सदस्यत्व शुल्क केवळ ७९९ रुपये होते. त्यामुळे आपण सायबर फसवणुकीचा बळी पडलो असल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ बँक आणि पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला.

ग्राहक आयोग काय म्हणाले?

आयोगाने तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे मान्य केले. मात्र, तक्रारदाराने स्वत:च फसवणूक करणाऱ्यांना ‘गोपनीय तपशील’(ओटीपी) दिल्याचे अधोरेखित केले.  रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असल्यास  संपूर्ण नुकसान ग्राहकानेच सहन करावे लागते, असे आयोगाने नमूद केले. त्यामुळे बँकेकडून सेवेतील कोणतीही त्रुटी झालेली नसल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने तक्रार फेटाळली.

बँकेचे म्हणणे काय?

- संबंधित व्यवहार ओटीपी पडताळणीनंतर सुरक्षित पद्धतीने झाला असून, ओटीपी हा गोपनीय असतो आणि तो फक्त कार्डधारकालाच माहीत असतो, असे बँकेने नमूद केले. - एचडीएफसी बँकेच्या उत्तराने समाधान न झाल्याने  तक्रारदाराने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली आणि बँकेच्या निष्काळजीपणामुळे आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा दावा केला. - सेच, बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याचा आरोपही केला. तक्रारदारानेच फसव्या लिंकवर क्लिक केले आणि त्याच्या सर्व तपशीलांशी जुळणारी माहिती असल्याने ओटीपी तयार झाला. त्यामुळे व्यवहार नाकारण्याचे बँकेकडे कोणतेही कारण नव्हते, असे बँकेने न्यायालयाला सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Customer's OTP Sharing Leads to Dismissal of Bank Negligence Claim

Web Summary : Mumbai resident lost money sharing OTP. Consumer forum rejected negligence claim, citing customer carelessness. RBI guidelines state customer bears losses from negligence. Bank not at fault.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकhdfc bankएचडीएफसी