शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नेपाळची शारदा भारताच्या यमुनेला देणार जीवनदान, शेतीलाही येणार 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:33 IST

भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे.

नवी दिल्ली- भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे. तसेच देशातील प्रमुख पर्यावरण पर्यटन योजनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच दिल्लीसह उत्तराखंडला ही या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे.या योजनेमुळे डोंगराळ भागात वीज, पाणी आणि रोजगाराबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. या योजनेचा आराखडा(डीपीआर) तयार करण्यात आला असून, त्यावर दोन्ही देशांतील तज्ज्ञांची टीम अध्ययन करते आहे. दोन दशकांपूर्वी महाकाली पाणी कराराच्या माध्यमातून भारत व नेपाळने शारदा नदीवर पंचेश्वर बांध योजनेचं काम सुरू केलं होतं. परंतु या योजनेला खरी चालना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014च्या नेपाळ दौ-यानंतर मिळाली आहे.केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाशी संबंधित वॉटर अँड पॉवर कन्स्लटन्सी सर्व्हिसेज(वापकोस)ने हा डीपीआर बनवला आहे. आता याच्या अध्ययनासाठी 26 सदस्यांची एक टीमही बनवण्यात आली आहे. यात भारत आणि नेपाळमधील 18 सदस्यांचा समावेश आहे. या टीमच्या चार बैठक होणार असून, त्यानंतर दोन्ही देशांना या योजनेसंदर्भात अहवाल देण्यात येणार आहे. अतिरिक्त पाण्यानं स्वच्छ होणार यमुनाया योजनेचा फायदा जास्त करून नवी दिल्लीला होणार आहे. पंचेश्वर बांध तयार केल्यानंतर यमुना नदीला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. यमुनेच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीचं पाणी स्वच्छदेखील होणार आहे. त्यामुळे दिल्लीला स्वच्छ पाण्याचा पुरवठाही वाढणार आहे. ही योजना अस्तित्वात येण्यासाठी जवळपास 33108 कोटी रुपयांइतका खर्च होणार आहे. त्यातील 62.3 टक्के खर्च भारत देणार असून, उर्वरित खर्च नेपाळ करणार आहे. यामुळे 5050 मेगावॉट विजेचं उत्पादन होणार आहे. तसेच 4.3 हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली येणार आहे. भारतातल्या जवळपास 2.6 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजना पूर्ण होणय्साठी 4592 कोटी रुपये दर वर्षाला खर्च आहे. यातील 3665 कोटी रुपयांचा विजेचा फायदा व 837 कोटी रुपयांच्या सिंचनाच्या क्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच पूरग्रस्त भागालाही त्याचा फायदा होणार आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीNepalनेपाळ