शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'मिआ बाय तनिष्क'च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
4
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
6
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
7
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
8
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
9
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
10
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
11
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
12
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
13
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
14
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
15
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
16
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
17
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
18
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
19
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
20
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल

'ती' ५ महिन्यांपासून कोरोनाशी लढतेय; ३१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टर बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:13 IST

राजस्थानातील महिलेवर पाच महिन्यांवर उपचार सुरू; डॉक्टर चिंतेत

भरतपूर: देशात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. आतापर्यंत १ कोटी ६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी जवळपास १ कोटी ३ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला देशात २ लाखांहून कमी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र राजस्थानच्या भरतपूरमधील एका महिलेला झालेल्या कोरोनामुळे डॉक्टर वर्ग बुचकळ्यात पडला आहे.तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहितीभरतपूरच्या अपना घर आश्रमात भरती असलेल्या शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. ४ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्याप त्या कोरोनामुक्त झालेल्या नाहीत. गेल्या ५ महिन्यांत त्यांच्या ३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शारदा देवी बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरदेखील चिंतेत आहेत. अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी आता शारदा देवी यांना जयपूरमध्ये हलवण्यात येणार आहे.काळजी वाढली! फेब्रुवारी मार्चमध्ये भारतात येणार कोरोनाची दुसरी लाट? तज्ज्ञांनी सांगितले की...अपना घर आश्रमचे संचालक डॉ. बी. एम. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा देवींच्या आई वडिलांचं निधन झालं आहे. त्यांना सासरच्या माणसांनी घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर त्या अपना आश्रमात आल्या. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ४ सप्टेंबरला चाचणीचा अहवाल आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत ३१ वेळा शारदा देवींची कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टर चिंतेत आहेत.शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण काही दिवसांत बरे होतात. मात्र शारदा देवी कोरोनामुक्त होत नसल्यानं डॉक्टरदेखील आश्चर्य चकित झाले आहेत. शारदा देवींना लवकरच उपचारांसाठी जयपूरला नेण्यात येणार आहे. गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शारदा देवींचं वजनदेखील वाढतं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या