शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शरद यादव मौनात, नितीश कुमारांच्या पक्षातही 'मूक यादवी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:38 IST

भाजपासोबत आघाडी करुन नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण त्यांचा हा निर्णय शरद यादव यांना फारसा आवडला नसल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देशरद यादव संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते असून मागच्या अनेकवर्षांपासून ते नितीश कुमारांसोबत पक्ष चालवत आहेत. गुरुवारी सकाळी पाटण्यात नितीश कुमार यांचा शपथविधी झाला पण त्यावेळी

पाटणा, दि. 27 - भाजपासोबत आघाडी करुन नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण त्यांचा हा निर्णय शरद यादव यांना फारसा आवडला नसल्याची चर्चा आहे. 70 वर्षीय शरद यादव संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते असून मागच्या अनेकवर्षांपासून ते नितीश कुमारांसोबत पक्ष चालवत आहेत. बुधवारी संध्याकाळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या घटनेला 24 तास पूर्ण होण्याआधीच भाजपाच्या पाठिंब्याने नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

बिहारमध्ये काल संध्याकाळपासून इतक्या वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शरद यादव यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. गुरुवारी सकाळी पाटण्यात नितीश कुमार यांचा शपथविधी झाला पण त्यावेळी शरद यादव अनुपस्थित होते. अलीकडेच दिल्लीत विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. त्यावेळी शरद यादव यांनी आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींविरोधात लढत राहू असे आश्वासन दिले होते. 

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारी नाट्याला झालेली सुरुवात पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. यानंतर नितीश कुमार यांना पत्रकारांशी कोणताही संवाद न साधता थेट घरी जाणे पसंद केले. मात्र सुशील मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शपथविधी सकाळी पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 'आम्ही राज्यपालांना भेटलो आहे. आमच्याकडील 132 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींना दिले आहे.

आम्ही विश्वास ठराव पास करु', असं सुशील मोदी बोलले होते.  दरम्यान, 1:30 वाजता राजभवनातून नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी राज्यपालांना भेटून गेल्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांसह तेजस्वी यादव यांनी राजभवनावर आपला मोर्चा काढला होता. यावेळी राजभवनाच्या परिसरात नितीश कुमार विरोधात तेजस्वी यादवांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरजेडीच्या सहा आमदारांना भेटण्याची परवानगी मिळाली होती.