शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 21:59 IST

महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी धक्का बसला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना दुसरीकेड छगन भुजबळ कारागृहाची हवा खात आहेत. आता केरळमध्येही पक्षाच्या मंत्र्याचे हात बेकायदेशीर कारवायांत बरबटले असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. सत्तेत आल्यापासून डावी लोकशाही आघाडीच्या तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री थॉमस चंडी यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर बांधकाम केल्याचा ठपका चंडी यांच्यावर आहे. चंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2016 पासून डावी लोकशाही आघाडी केरळमध्ये सत्तेत आहे.वाहतूक मंत्री चंडी यांच्या कंपनीने बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून पार्किंग परिसरात बांधकाम केले आहे, असे आरोप आहेत. शिवाय, अलाप्पुझ्हा जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी चंडींनी भाताच्या शेतीतून रस्ता तयार केला आहे, असाही आरोप आहे. चंडींच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने सुनावणी देत चंडींची कानउघडणी केली. त्यानंतर आज त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

(थॉमस चंडी )

मंगळवारी केरळ हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाला स्थगिती देण्याबाबत चंडी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळाली होती. तुम्ही सत्तेत असताना सरकारच्याच अहवालाला आव्हान कसे देऊ शकता असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. दुसरीकडे भाजपनेही चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी सकाळी चंडी यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांनीही चंडी यांचा राजीनामा मंजूर केला.

थॉमस चंडी हे सर्वात श्रीमंत मंत्री म्हणून ओळखले जातात. राजीनाम्यानंतर चंडी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिवहन खाते राष्ट्रवादीकडेच ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. मी किंवा आमदार ए के ससिंद्रन यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते खाते रिक्त असेल असे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार