शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:21 IST

 महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली.

नवी दिल्ली -  महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सस्पेन्स वाढवणारे विधान केले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून तसा प्रस्तावच आलेला नाही, मग त्यावर विचार कसा करणार, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सोनिया गांधी यांना पुन्हा भेटणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय खेळ अजून काही काळ सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोनिया गांधी यांना भेटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की,''राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि एनसीपीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढे काय करायची याबाबत रणनीती ठरवली होती. त्यानंतर आज मी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी हेसुद्धा उपस्थित होते.'' यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले.''शिवसेना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सरकार स्थापन करण्याबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेने अद्याप विचारणा केलेली नाही. आम्हीही कुणाशी संवाद साधलेला नाही. तसेच कुणाशी बैठकही घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले.  ''महाराष्ट्रामध्ये आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ आमच्याकडे नाही. राज्यात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सरकार बनवण्याची जबाबदारी भाजपाची आहे.'' असे पवार म्हणाले. दरम्यान, आज झालेल्या सोनिया गांधींसोबतच्या चर्चेनंतर आपण राज्यातील नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असून, त्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीShiv Senaशिवसेना