शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 09:28 IST

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आल्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Justice Statue: देशातील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन न्यायदेवतेच्या पुतळ्यावरील डोळ्याची पट्टी काढण्यात आली आहे. याशिवाय आता तलवारीऐवजी एका हातात संविधान ठेवण्यात आले आहे. जेणेकरून देशातील कायदा आंधळा नाही असा संदेश देता येईल. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. हा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात आला आहे. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या डोळ्यावर पट्टी नाही आणि हातात तलवारीऐवजी संविधान आहे.  तसेच एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान ठेवण्यात आलं आहे. देशातला कायदा आंधळा नाही आणि तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारीत आहे, असा संदेशही नव्या पुतळ्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा पुतळा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी बसवला आहे.

या नव्या पुतळ्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी बोलताना कौतुक केलं आहे. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते. "या पुतळ्यातून सरन्यायाधीशांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात कधी झाला नव्हता तो त्यांनी केला," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, न्यायदेवतेच्या डोळ्याभोवती बांधलेल्या पट्टीचा विशेष अर्थ होता. डोळ्यावर पट्टी कायद्यासमोर समानता दर्शवते. याचा अर्थ कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. यामध्ये ना ज्याच्याकडे पैसा आहे त्याला महत्त्व दिले जाते ना पद, सत्ता आणि पद याला महत्त्व दिले जाते. न्यायालय त्यांच्यासमोर हजर होणाऱ्यांची संपत्ती, सत्ता आणि दर्जा पाहत नाही. तर त्यांच्या हातातील तलवारीचे महत्त्व इतकेच आहे की, कायद्यात गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे अधिकार आहेत.

न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात आलेला नवीन पुतळा पांढरा रंगाचा आहे. या पुतळ्याने भारतीय पोशाख - साडी परिधान केली आहे. तिच्या डोक्यावर एक मुकुट देखील आहे. पौराणिक कथांमध्ये ज्याप्रमाणे देवींच्या डोक्यावर मुकुट असल्याचे वर्णन केले आहे तशा पद्धतीने.  कपाळावर टिकली देखील आहे. तिने दागिनेही घातले आहेत. त्याच्या एका हातात पूर्वीसारखा तराजू आहे, पण दुसऱ्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSharad Pawarशरद पवारDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड