शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST

देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar On Operation Sindoor: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही, तर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले असं शरद पवार म्हणाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन सोहळे पार पडत आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला.  यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधावर लक्ष वेधले. यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख न करता निशाणा साधला. ज्या बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला तोसुद्धा आपल्यासोबत नाही, असं शरद पवार म्हणाले.

"राष्ट्राच्या हितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कधी राजकारण करणार नाही. पहलगाममध्ये काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्यामागे कोण आहे याची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर शासनाने कोणतीही भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही करू. याच्यामध्ये राजकारण आणणार नाही असं सांगितलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा," असं शरद पवार यांनी म्हटलं.

"आज तुम्ही देशाचा नकाशा बघितला तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, शेजारी पाकिस्तान आहे. खाली गेलात की श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण भारत यांच्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश असा या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानसोबत आपले संबंध चांगले नाहीत, चीनसोबत आपले संबंध चांगले नाहीत, बांगलादेश या देशासाठी भारताने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. श्रीलंकेबाबतही चिंता आहे. त्या ठिकाणी असलेला चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहेय सबंध देश आणि आपल्या शेजारचे देश यांच्यात सुसंवाद आहे अशी म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे की देशाचे नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याची किंमत ही देशाला द्यावी लागते आहे," असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी