शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही, राजीनामा द्यावा - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 20:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या राज्यपालांवर टीका केली आहे.

बेंगळुरू  - आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यामुळे कर्नाटकातील  भाजपा सरकार कोसळले. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत येडियुरप्पा आणि राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शरद पवार म्हणाले की, ''आवश्यक बहुमताचा आकडा नसताही भाजपाने येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती. बहुमत नसतानाही येडियुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय म्हणजे संसदीय लोकशाहीवर आघात आहे. कर्नाटकाच्या राज्यापालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही. त्यांनी लोकशाहीवर उलटा आघातच केला. त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा आहे'' कर्नाटकात सत्ता मिळवल्याबद्दल शरद पवार यांनी काँग्रेस आणि जेडीएसचे अभिनंदनदेखील केले.  जेडीएसचे आमदार कुठल्याही आमिषाला न भुलता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत त्याबाबत काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे त्यांनी अभिनंदन केले.

कर्नाटक विधानसभेत 112 ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांनी जंग जंग पछाडलं. काँग्रेस-जेडीएस-बसपा एकत्र आल्यानं 104 वरून 112 पर्यंत मजल मारणं सोपं नव्हतं, पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांवर त्यांची मदार होती. राज्यपालांनी 15 दिवसांची मुदत दिल्यानं ते तसे निर्धास्त होते. पण, अचानक सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिला आणि त्यांची सगळीच गणितं बिघडली. 

तरीही, आज सकाळपर्यंत भाजपाची, येडियुरप्पांची मोर्चेबांधणी सुरूच होती. पण दुपारी शपथविधी झाल्यानंतर मात्र त्यांच्या आशा मावळल्या. येडियुरप्पांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. विधानसभेचं कामकाज साडेतीन वाजेपर्यंत स्थगित झालं, त्यानंतर सगळंच चित्र बदललं आणि भाजपाने माघार घेतल्याचे संकेत मिळाले.

टॅग्स :Floor Testबहुमत चाचणीKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Sharad Pawarशरद पवार