शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक बाबीत लुडबूड करु नये, PM मोदी...”; शंकराचार्य स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 14:06 IST

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: ...तर आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू. गॅरंटी देतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला आहे, याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे जोपर्यंत पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुचींवर विराजमान होत नाही तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, अशी खंत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली होती. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर पुन्हा एकदा शं‍कराचार्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

मीडियाशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, राजकारणी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असतील, तर त्यांनी धर्माचे पालन करायला पाहिजे. धर्माचे मर्म जाणून घेऊन ते आचरणात आणणारेच खरे हिंदू असतात. धर्माचाऱ्याने वेळोवेळी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे, अन्यथा धर्माचाऱ्याने त्याचे काम केले नाही, असे होईल. म्हणून वेळोवळी धर्माची व्याख्या करत असतो, असे शं‍कराचार्यांनी सांगितले. 

राजकारण्यांनीही विश्वासघातासारखे कार्य करणे योग्य नाही

माझे राजकारणाशी काही देणेघेणे नाही. पण राजकारण्यांनीही विश्वासघातासारखे कार्य करणे योग्य नाही. ज्यांनी उपकार केले, त्यांच्याच विश्वासघात करणे योग्य नाही. मी संन्यासी आहे. राजकीय भाष्य करणे टाळायला हवे, हे खरे आहे. परंतु, हाच नियम राजकीय पुढाऱ्यांना देखील लागू होतो. त्यांनीही धार्मिक बाबीत लुडबुड करता कामा नये, असे शंकराचार्य म्हणाले.

नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत

नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. नरेंद्र मोदी आले त्यांनी नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. त्यांच्या हिताच्या गोष्टी आम्ही सांगत आहोत. जर त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही त्यांची चूक दाखवून देतो. पंतप्रधान मोदी मंदिरात येऊन प्राणप्रतिष्ठा करू लागले, तर माध्यमे त्याचे थेट प्रक्षेपण करतात. जर शंकराचार्य मंदिर आणि धर्माबाबत बोलले तर तुम्ही आम्हालाच उलट शिकवता. राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे बंद करावे आणि गॅरंटी देतो की, आम्हीही राजकारणाबाबत बोलणे बंद करू, असा शब्द शं‍कराचार्यांनी दिला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी