शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मला ठार मारून जंगलात पुरण्याचा शामीचा कट होता; हसीनचा आणखी एक सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:43 IST

एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला आहे.

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शामीच्या आयुष्यात आलेल्या वादळांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शामीची पत्नी दिवसेंदिवस त्याच्यावर खळबळजनक आरोप करत आहे. तर, शामी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण देतोय. मला पत्नीसोबत बोलायचं आहे पण ती माझा फोन उचलत नाही असं शमी म्हणाला. पत्नी हसीन शामीचा फोन जरी उचलत नसली तरी विविध न्यूज चॅनल्सला ती इंटरव्यू देत आहे.  एका पाकिस्तानी मुलीसोबत शमीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळखी वाढविणे आणि त्यांच्याशी संबंध स्थापन करणे अशा कृत्यात मोहम्मद शमी गुंतला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर हसीनने शामीवर आणखी एक आरोप केला आहे. एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला आहे. माझा खून करून मृतदेह जंगलामध्ये दफन करून टाक असं शामी त्याच्या भावाला म्हणाला होता असा गंभीर आरोप हसीनने केला आहे. हसीन पुढे म्हणाली, शमीने अनेकदा माझ्याकडे तलाकची मागणी केली आहे. तुला ज्या व्यक्तीसोबत राहायचं त्याच्यासोबत राहा, मला काही फरक पडत नाही. तुझ्या मुलाला घेऊन या घरातून निघून जा, मला काहीही घेणंदेणं नाही. जर घर सोडून नाही गेलीस तर धक्के मारून घरातून बाहेर काढेल अशी धमकी शमीने दिली होती, असे आरोप तिने केले आहेत. माझ्याविरुद्ध कट - शामीदुसरीकडे पत्नीच्या आरोपांमुळे वैतागलेल्या शामीवर बीसीसीआयने नव्या करार यादीतून वगळल्याचा दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोन धक्के सहन करणा-या शामीने काल अखेर मीडियापुढे येत पत्नीने केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.पत्नीचे सर्व आरोप फेटाळताना शमीने हा माझ्याविरुद्ध रचलेला कट आहे. माझे करियर उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव असल्याचे म्हटले होते.माझ्याविरुद्धचे आरोप बिनबुडाचे असून हसीनने शमी पाच वर्षांपासून मला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आमच्या लग्नाला केवळ चार वर्षे झाली. इतक्या वर्षांपासून हे होत असेल तर आताच ते बाहेर का आले? या बाबी बाहेर येण्यास पाच वर्षे का लागली? मी सामान्य नागरिक आहे. सणासुदीला घरी असेल तेव्हा कुटुंबीयांसोबत राहतो. पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवितो.काही दिवसाआधी माझी पत्नी सोशल मीडियावर ट्रोल झाली त्यावेळी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होतो आणि यापुढेही तिच्यासोबत उभा असेन,’ ज्या मोबाईलबाबत पत्नी सांगते, तो माझा नाही. मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या कशा काय स्वीकारू. तो माझा नंबर नाही. द. आफ्रिकेत हसीनने शॉपिंगसाठी हट्ट केला तेव्हा मी तिला घेऊन गेलो. निवडकर्ते माझ्यासोबत होते. शॉपिंग केली, ज्वेलरी घेऊन दिली. सोबत होळी साजरी केली. अचानक काय घडले हे मलाही ठाऊक नाही.’मी हसीनसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिने फोन उचलला नाही. मी माझ्या सास-यांसोबत चर्चा केली. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली. यावर लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे.’

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीCricketक्रिकेट