शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
2
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
3
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
4
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
5
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
6
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
7
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
8
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
9
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
10
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
11
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
12
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
13
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
14
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
15
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
17
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
18
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
19
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
20
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:43 IST

केरळीयन समुदायाकडून दुबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या केरळच्या नागरिकांनी आफ्रिदीला पाहुणा म्हणून बोलविले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबदद्ल प्रचंड चीड असून भारताची देवभूमी समजल्या जाणाऱ्या केरळ राज्यातील नागरिकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत केले आहे. याच आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे समर्थन तसेच भारतीय सैन्याबाबत अपशब्द वापरले होते. त्याचेच स्वागत केरळीयन करत असल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 

केरळीयन समुदायाकडून दुबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या केरळच्या नागरिकांनी आफ्रिदीला पाहुणा म्हणून बोलविले होते. आफ्रिदी येताच या लोकांनी जोरजोरात ओरडत त्याचे स्वागत करण्यास सुरुवात केली. आफ्रिदी पोहोचताच उपस्थितांनी बुम-बुमचे नारे लावले आणि जल्लोष करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोक चिडले आहेत आणि भारताचेच राज्य असून पाकिस्तानी क्रिकेटर तो सुद्धा भारताविरोधात गरळ ओकणाऱ्याचे असे स्वागत केले जात असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी केरळीयन लोकांना सुनावण्यास सुरुवात केली आहे. 

या कार्यक्रमात आफ्रिदीने त्याला केरळ राज्य आणि तेथील जेवण खूप आवडत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर भारतीयांनी केरळीयन लोकांना ऐकविण्यास सुरुवात केली आहे. लज्जास्पद बाब आहे! देशभक्ती कुठे गेली यांची, असा सवाल काहींनी विचारला आहे. तर आयोजकांनी कोणत्याही भारतीयाला का बोलावले नाही, असा सवालही विचारण्यात आला आहे. शाहिद आफ्रिदीला कोणत्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

काश्मीरमध्ये तुमच्याकडे ८,००,००० सैन्य आहे आणि हे अजूनही घडत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आणि निरुपयोगी आहात, असे पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदीने भारतीय सैन्याबदद्ल म्हटले होते. तसेच त्यापूर्वी एप्रिलमध्ये त्याने "भारतात फटाके फुटले तरी पाकिस्तानकडे बोटे नेहमीच उचलली जातील", असेही म्हटले होते. आफ्रिदी नेहमीच भारताचा दु:स्वास करत आला आहे. अशा व्यक्तीला भारतातील नागरिकांनी कार्यक्रमाला बोलविणे आणि त्याचे स्वागत करणे हे भारतीयांना काही रुचलेले नाही. 

टॅग्स :Shahid Afridiशाहिद अफ्रिदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरKeralaकेरळ