शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहनाज बनली आरोही... कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्याने नवऱ्याने दिला तलाक; हिंदू मित्राशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 10:21 IST

एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक असा प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक तरुणी भगवान श्रीकृष्णाची भक्त होती म्हणून तिला तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली. तरुणीने जेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला अपशब्द वापरले. कुटुंबीयही तिच्या विरोधात गेले. जेव्हा कोणताही आधार मिळाला नाही तेव्हा मुलीला तिच्या बालपणीच्या एका हिंदू मित्राची आठवण झाली आणि तिने त्याला आपली व्यथा सांगितली. 

हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीने इस्लाम धर्म सोडून आता एका हिंदू मित्राशी लग्न केलं आहे. बरेलीच्या फरीदपूर पोलीस ठाण्याच्या ढाकनी राजपुरा गावात राहणारी शहनाज हिचा 2018 मध्ये निकाह झाला होता. ती लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची भक्त होती आणि त्यांची पूजा करत असे. शहनाजचे कुटुंबीय याला विरोध करत होते आणि म्हणायचे की त्यांच्या धर्मात पूजा केली जात नाही.

शहनाजने कोणाचेही ऐकले नाही आणि लग्नानंतरही ती भगवान श्रीकृष्णाची भक्त राहिली. दुसरीकडे ही बाब सासरच्या घरात कळताच एकच गोंधळ उडाला. पती आणि सासरच्यांनी तिला पूजा करताना पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हे पाहून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला. मुलीने जेव्हा तिचा बालपणीचा मित्र पवन कुमार याला तिची व्यथा सांगितली तेव्हा त्याने तिला साथ दिली. या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही बरेलीला पोहोचले आणि अगस्त आश्रमात गेले आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.

पती आणि घरच्यांच्या अत्याचारामुळे शहनाज खूप अस्वस्थ होती. कुटुंबातील एकही सदस्य मदत करायला तयार नव्हता. याच दरम्यान त्यांना एक व्यक्ती भेटली. अगस्त आश्रमाबद्दल सांगितले. ही माहिती मिळताच दोघांना आशेचा किरण दिसला आणि क्षणाचाही विलंब न लावता दोघेही आश्रमात पोहोचले आणि त्यांनी आपला मुद्दा महंतांना सांगितला. लग्न झाल्यानंतर आता शहनाजने आता तिचे नावही बदलले आहे. शहनाजने सांगितले की, आता तिला आरोही या नावाने हाक मारावी. तरुणीने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून सुरक्षेची विनंती केली आहे. कुटुंबाकडून जीवाला धोका असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न