शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाहीनबाग : व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करा : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 06:40 IST

निदर्शकांनी आधी रविवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती.

1 जामिया मिलिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून १५ डिसेंबर रोजी पोलीस व निमलष्करी जवान विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करीत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर शेअर केला व यानंतरही पोलिसांवर कारवाई झाली नाही, तर सरकारचा असली इरादा जगापुढे येईल, असे म्हटले.2 पोलिसांनी ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली नाही, असे दिल्ली पोलीस व गृहमंत्री अमित शहा यांनी खोटे सांगितले, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होते, असेही त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले. विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश असलेल्या जामिया समन्वय समितीने रविवारी ४८ सेकंदांचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला.3 हा व्हिडिओ आमच्याही पाहण्यात आला आहे व जामियातील घटनांच्या सुरू असलेल्या तपासात त्या अनुषंगानेही चौकशी केली जाईल, असे गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी सांगितले.शाहीनबाग : गृहमंत्र्यांशी चर्चेसाठी परवानगीची प्रतीक्षानवी दिल्ली : प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर नवीन नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानाकडे कूच करणार. पोलिसांकडून परवानगी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. पोलिसांनी वेळ मागितला आहे, असे शाहीन बाग निदर्शकांनी म्हटले आहे.

निदर्शकांनी आधी रविवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मोर्चाने जाण्यासाठी शाहीन बाग परिसरात शेकडो महिला जमल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी कठडे लावण्यात आले आहेत. निदर्शकांना तेथून दूर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यासाठी शाहीन बागची दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांसह निदर्शकांनी आठ सदस्यांचे एक शिष्टमंडळ निवडले आहे. विनंतीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी यासाठी काही वेळ मागितला आहे. पोलिसांची मंजुरी मिळाल्यानंतर निदर्शक आपला कार्यक्रम आखतील, असे निदर्शक जावेद खान यांनी सांगितले. आवश्यक मंजुरी न मिळाल्याने सीएएविरोधी निदर्शक निदर्शनाच्या ठिकाणी परतले आहेत. दरम्यान, आग्नेय दिल्लीचे पोलीस आयुक्त आर.पी. मीणा आणि अतिरिक्त आयुक्त कुमार ज्ञानेश व शाहीन बाग पोलीस ठाणे अधिकाºयाने निदर्शकांच्या एका गटाशी चर्चा केली. पुढील कार्यवाही निवदेन संबंधित अधिकाऱ्यांनाकडे पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, नवीन नागरिकत्व कायद्याशी संबंधित मुद्यावर चर्चा करण्यासाठी कोणतीही इच्छुक व्यक्ती माझ्या कार्यालयाकडून वेळ घेऊ शकते.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNew Delhiनवी दिल्ली