शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

CAA Protest: फळं, बिर्याणी अन् पाणी; शाहीनबागेतील आंदोलनकर्त्यांना पुरवली जाते खाण्याची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 10:28 IST

पोलिस येथे चोवीस तास तैनात असतात आणि ते नेहमी सतर्क असतात जेणेकरुन मोर्चाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना येथून उचलून नेता येईल

नवी दिल्ली - 'जर तुमच्या घरी कोणी येत असेल तर ते रिकाम्या हाताने येत नाही. नक्कीच काहीतरी घेऊन येतात. शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेध आंदोलनात असचं काहीसं सुरू आहे. इथे कोणी येत असेल तर तो आंदोलकांसाठी काहीतरी खाण्याचं घेऊन येतो. जसं मी कॉलेजमध्ये शिकतो आणि मी येथे रोज येतो, कधीकधी डझनभर केळी आणतो, कधीकधी दुसरंकाही. जेणेकरून जे लोक संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत त्यांना मी पाठिंबा देऊ शकतो असं शाहिद बागच्या स्टेजजवळ केळी वाटप करणारा विद्यार्थी मोहम्मद अफरोज यांचं म्हणणं आहे. 

मोहम्मद अफरोजने सांगितले की आम्ही इतके दिवस याठिकाणी कसे बसलो आहोत हा सर्वांचाच प्रश्न आहे. अन्न कसे येत आहे, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुमचा हेतू चांगला असला तर कोणतीही समस्या आली तरी त्या प्रत्येक अडचणीवर मात केली जाऊ शकते. 

आंदोलनकर्ते अझीम अशरफ म्हणतात की, पोलिस येथे चोवीस तास तैनात असतात आणि ते नेहमी सतर्क असतात जेणेकरुन मोर्चाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना येथून उचलून नेता येईल. पण इथे असे काहीतरी घडत असते तर आम्ही इथं का बसलो असतो. लोक फार दुरुन येतात. आणि कधीकधी बिर्याणी, पाणी, फळ आणि इतर पदार्थ खायलासोबत घेऊन येतात. मग आम्ही सर्व खाण्याच्या वस्तू आंदोलनकर्त्यांमध्ये वाटप करत असतो. काही महिला घरून जेवण करुन येतात आणि सोबतही घेऊन येतात. साधारणपणे दुपारी जेवणाचे वाटप केले जाते. 

तसेच आम्ही आमच्या परिसराबद्दल माहिती असलेल्या लोकांकडे जातो आणि त्यांच्याकडे मदतीसाठी विचारतो. मग ते कधीकधी आंदोलनकर्त्यांना ब्लँकेट आणि गाद्या देतात. अशाप्रकारे आमचं आंदोलन सुरु आहे असं इमाद अहमद यांनी सांगितले. निषेध करणारी महिला नूर जहां म्हणते की जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करता तसं आम्ही आमच्या घरातून जे सामान आणतो जेणेकरुन आम्ही आमच्या पाहुण्यांची काळजी घेऊ शकू कारण ते आमच्या संघर्षात आमच्यासोबत उभे राहतील.

पंजाबमधील आलेल्या लोकांनी केलं अन्नधान्य दान शाहीन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलकांसाठी लंगर बनवले गेले होते, जे संध्याकाळपर्यंत चालते, शेकडो लोक खाण्यासाठी येतात. याबाबत माहिती देताना हमासिमरन सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा पंजाबमधील आमचे भाऊ येतात. ते निषेध करणार्‍यांना अन्नधान्य देतात आणि त्यांच्यामुळेआम्ही लोकांना एका वेळेसाठी अन्न देऊ शकतो. त्याचप्रमाणे, इतर कोणत्याही राज्यातून लोक येतात, ते कधीकधी गहू, तांदूळ आणि पीठ घेऊन येतात. 

टॅग्स :Muslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPunjabपंजाब