नवी दिल्लीः दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचनं आरोपी कपिल गुर्जरची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे. कपिल गुर्जरच्या वडिलांनी 2019मध्ये आपची सदस्यता घेतली होती. क्राइम ब्रँचला तपासादरम्यान गुर्जरच्या मोबाइलमध्ये काही फोटो सापडले असून, त्यातूनच हा खुलासा झालेला आहे.या फोटोंमध्ये कपिल गुर्जर आणि त्याचे वडील गजे सिंह आम आदमी पार्टीचे संसद संजय सिंह, आप नेते आतिशीबरोबर दिसत आहेत. तसेच एका फोटोत कपिलचे वडील गजेसिंह गुर्जर दिल्लीतले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांबरोबर पाहायला मिळतायत. हा फोटो जवळपास वर्षभरापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोमध्ये कपिल आपची सदस्यता घेताना दिसतोय. तसेच कपिल आणि त्याच्या वडिलांसोबत कपिलचे जवळपास एक डझनांहून अधिक मित्र नेत्यांसोबतच्या फोटोत दिसत आहेत. याचदरम्यान त्यानं आम आदमी पार्टीची टोपीसुद्धा घातलेली पाहायला मिळतेय. शाहीन बागमध्ये कपिल गुर्जरनं हवेत गोळीबार केला होता.
शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:31 IST
दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड
ठळक मुद्देशाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचनं आरोपी कपिल गुर्जरची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे.क्राइम ब्रँचला तपासादरम्यान गुर्जरच्या मोबाइलमध्ये काही फोटो सापडले असून, त्यातूनच हा खुलासा झालेला आहे.