नवी दिल्ली : विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात अगदी परत आलाच तरी तो लोकांच्या खात्यात जमा होणार नाही, हे सगळ््यांनाच ठाऊक आहे, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जनतेची दिशाभूल केल्याची जणू कबुलीच गुरुवारी दिली. विदेशात जमा असलेला काळा पैसा १०० दिवसांच्या आत भारतात आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करू, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनावरून विरोधकांच्या भडिमारावर मोदींचे समर्थन करता करता शहा यांनी हे वक्तव्य एका वृत्त वाहिनीशी बोलताना केले. मोदींनी दिलेल्या त्या आश्वासनाकडे राजकीय वाक््प्रचार म्हणून पाहायला हवे. विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात आणणे आणि त्या पैशाचा गरिबांच्या विकासासाठी उपयोग करणे असा या आश्वासनामागचा विचार होता. त्याचा अर्थ शब्दश: घेणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद शहा यांनी मोदींच्या बचावार्थ केला. जुमला (वाक््प्रचार) आणि आश्वासन यात मोठा फरक आहे, असा शब्दच्छल शहा यांनी केला. दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावत असताना खुद्द पक्षाध्यक्षच ही कबुली देऊन चुकले. शॉटगन सिन्हाने तोफ डागली...दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तर ते मोदी सरकारच्या कामगिरीवरचे सार्वमत मानायचे की नाही, यावरून भाजपात दोन तट पडले आहेत. दिल्लीतील निकाल हा मोदी सरकारच्या कामगिरीसाठी सार्वमत ठरत नाही, तसेच दिल्लीची निवडणूक पंतप्रधान निवडण्यासाठी होत नाही, असे सांगत पक्षाध्यक्ष शहा यांनी केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या सुरात सूर मिसळला असला तरी या निवडणुकीच्या श्रेयाचे तसेच अपश्रेयाचे धनीही मोदीच असतील, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी उघड तोफ डागली आहे. किरण बेदी यांच्यापेक्षा डॉ. हर्षवर्धन यांची छबी घेऊन लढण्याने फायदा झाला असता, हे ‘शॉटगन’ सिन्हा यांचे मत हा जणू पक्षांतर्गत स्फोटासाठीचा दारूगोळा ठरला आहे. भाजपातील एका मोठ्या वर्गाच्या मनातील भावनेला सिन्हा यांनी शब्द दिले आहेत. पक्षांतर्गत मतभेद या पद्धतीने मतदानाच्या तोंडावर चव्हाट्यावर आल्याचा फटका भाजपाला बसू शकतो. केजरीवालांचा अनुभव तोकडा दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी या आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि स्वत:च्या प्रशासकीय अनुभवाची तुलना तर केलीच शिवाय पळपुटे विशेषण लावत केजरीवाल यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला. मी आयुष्यातील ४० वर्षे प्रशासकीय सेवेत घातली आहेत़ याउलट आप प्रमुखांकडे जेमतेम पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे, असे बेदी म्हणाल्या़केजरीवालांनी स्वत:च्या पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण जारी करीत आम आदमी पार्टीला विजयी घोषित केले आहे. त्यांनी स्वत:ला हीरो बनण्याचा प्रयत्न चालविला आहे. - अमित शहा
काळ्या पैशांवरून ‘शहा’जोग दिशाभूल
By admin | Updated: February 6, 2015 02:41 IST