शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहा दाम्पत्य व्यथित... भारतीय ‘पणती’ जर्मन कायद्याच्या अंधारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 09:55 IST

मुंबईतील भावेश व  धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत.

कुंदन पाटीलजळगाव : घरात चिमुकली पणती आली. तेव्हा ‘शहा’गृह तेजाळून निघाले. चिमुकल्या आयुष्याला ‘अरिहा’ नाव वाहिलं. सहा महिन्यांची ही पणती आनंदकणच उधळत होती. नियतीच्या डोळ्यांना मात्र ते खुपत होते. म्हणूनच नियतीने अचानक अंधार पेरायला सुरुवात केली. अचानक अरिहाच्या नाजूकशा जागी जखम झाली. अरिहाला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. तिथेच जर्मनीसारख्या प्रगत देशाने संवेदनशीलपणाचा आव आणायला सुरुवात केली आणि तिथल्या प्रशासनाने तान्हुल्या पणतीला ताब्यात घेतले. व्यथित शहा दाम्पत्य दहा महिन्यांपासून कायद्याच्या दारातच उभे आहेत... त्यांची परी पुन्हा कुशीत परतावी म्हणून... 

मुंबईतील भावेश व  धारा (अहमदाबाद) हे दाम्पत्य जर्मनीतील बर्लीन शहरात वास्तव्याला आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये शहांच्या घरी  लेक जन्मली. सप्टेंबर २०२१ मध्ये अरिहाने  घातलेल्या डायपरवर रक्ताचे डाग दिसले. डायपर बदलताना तिच्या नाजूक जागी जखम झाल्याचे स्पष्ट झाले. धारा आणि भावेशने  अरिहाला दवाखान्यात दाखल केले. तिकडे जर्मन कायद्याने अरिहावर शस्त्रक्रिया सुरू केली. पोलिसांपाठोपाठ ‘जर्मन चाईल्ड केअर सेंटर’चे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी अरिहाला ताब्यात घेतले. तेव्हा शहा दाम्पत्याची कोंडी झाली. अरिहाच्या डीएनएसह सर्वच चाचण्या केल्या. सुदैवाने सारं व्यवस्थित; पण  तिथल्या कायद्याने धाराची कुशी पोरकी केली. अरिहाला एका जर्मन कुटुंबीयांच्या शिशुगृहात धाडलं आणि तिला ममत्व साधं स्पर्शही करू शकत नाही, अशी चौकटच उभी केली गेली. व्यथित भावेश आणि धाराने अनेकांपुढे मदतीसाठी हात पसरले. गुजरातच्या जैन समाज संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व  धाराचे वडील यांनीही  दिल्लीचे दरवाजे ठोठावले हाेते.

मानसिक छळाची मालिका अरिहाचा पासपोर्ट जर्मन प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. अरिहाला मांसाहार देऊ नका, अशा केलेल्या विनंतीची गांभीर्याने दखल घेतली नाही.  अरिहाला भारतातील नातलगांकडे सोपवा म्हणून मागणी केली. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अरिहावर जर्मन संस्कृती लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशाच भावना व्यक्त होत आहेत. अमेरिका आणि नॉर्वेतील अशा घटनांमध्ये यापूर्वी लेकींना भारतीय पालकांकडे स्वाधीन केले.

 

टॅग्स :Germanyजर्मनीGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद