शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST

५२ टक्केच पाऊस : विभागात ६० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वायासुषमा नेहरकर-शिंदेपुणे : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही अजून समाधानकारक पाऊस न पडल्याने पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया पसरली आहे. पावसाअभावी पुणे विभागातील तब्बल ६० हजार हेक्टरवरील खरिपाचे क्षेत्र वाया गेले आहे. वेळ निघून गेल्याने येथे दुबार पेरणीसुद्धा शक्य होणार नसल्याने ...


५२ टक्केच पाऊस : विभागात ६० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाया

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही अजून समाधानकारक पाऊस न पडल्याने पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया पसरली आहे. पावसाअभावी पुणे विभागातील तब्बल ६० हजार हेक्टरवरील खरिपाचे क्षेत्र वाया गेले आहे.
वेळ निघून गेल्याने येथे दुबार पेरणीसुद्धा शक्य होणार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यातच दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर होत असून, मंगळवारअखेर १ लाख ८९ हजार लोकांना ८५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
विभागात जून आणि जुलै महिन्याच्या सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊस झाला असून, पुण्यासह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. विभागातील चार जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतील स्थिती चिंताजनक बनली आहे.
ऑगस्ट महिना उजाडल्याने आता दुबार पेरणी करणे शक्य नसल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्यात सुरुवातीला चांगल्या पावसाने हजेरी लावली, पण त्यानंतर संपूर्ण जुलै महिना व ऑगस्टचे पंधरा दिवस कोरडे गेले आहेत.
---
धरणांची स्थिती चिंताजनक
पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोर्‍यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. सरासरी पाणीसाठा केवळ ५८ टक्के इतकाच झाला आहे. मागील काही वर्षांत १५ ऑगस्टपर्यंत बहुतेक सर्व धरणे शंभर टक्के भरतात. परंतु यंदा धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पात केवळ ५१.४८ टक्के पाणीसाठा आहे. नीरा खोरे ६० टक्के, कुकडी खोर्‍यात केवळ ३४ टक्केच पाणीसाठा आहे. उजनी खोर्‍यात ४१ टक्के साठा आहे.
------------------------------------------------------
टँकरची स्थिती
जिल्हाटँकरगावे-वाड्या बाधित लोकसंख्या
पुणे२०१०-१३७४०,६५७
सातारा२७३४-१५५५३,९३३
सांगली३०२९-१९२७८,७१३
सोलापूर८८१६,६८६
कोल्हापूर०००
----------------------------------------------------
एकूण८५८१-४८४१,८९,९८९