शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 00:02 IST

Sex Scandal Case : कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी संपल्यानंतर लगेचच खासदाराने देश सोडून पळ काढला.

बंगळुरु : बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप असलेले फरार जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट जारी केले आहे. हसनमधील लैंगिक शोषण प्रकरणांच्या मालिकेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अर्ज केल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले होते.

कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी संपल्यानंतर लगेचच खासदाराने देश सोडून पळ काढला. तो जर्मनीत असल्याचा संशय आहे. त्याच्या ठावठिकाणाविषयी माहिती घेण्यासाठी इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. प्रज्वल रेवण्णाविरुद्ध आतापर्यंत बलात्काराचे दोन आणि लैंगिक छळाचा एक गुन्हा दाखल आहे.

विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णाविरुद्ध आरोप असताना, त्याचे वडील आमदार एचडी रेवण्णा हे 28 एप्रिल रोजी हसनमधील होलेनरसीपूर टाउन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यांच्या घरच्या मदतनीसाने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

एचडी देवेगौडा यांनी सोडले मौन  आपला मुलगा आणि नातवावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांनी शनिवारी मौन सोडले आहे. जर नातू (प्रज्वल रेवण्णा) या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यास माझी हरकत नाही, असे एचडी देवेगौडा यांनी सांगितले. तसेच, एचडी  रेवण्णाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या गोष्टींवर मी भाष्य करू इच्छित नाही. या प्रकरणात अनेक लोक सामील आहेत आणि मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, असे एचडी देवेगौडा म्हणाले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी