शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

राजू बंधूंसह १० आरोपींना सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: April 10, 2015 08:25 IST

गुरुवारी या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बी. रामलिंग राजू यांच्यासह एकूण १० आरोपींना प्रत्येकी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि एकूण १३ कोटी रुपयांची शिक्षा ठोठावली.

 ७,१३६ कोटींचा घोटाळा; १३ कोटींचा दंड!

हैदराबाद : पूर्वी सत्यम् कॉम्प्युटर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीत लेखापुस्तके लिहिताना आणि त्यांचे लेखापरीक्षण करताना बनावटगिरी करून केल्या गेलेल्या ७,१३६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बी. रामलिंग राजू यांच्यासह एकूण १० आरोपींना प्रत्येकी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि एकूण १३ कोटी रुपयांची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारे भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील या सर्वांत मोठ्या लबाडीची सहा वर्षांनी जणू केवळ चापटी मारून सांगता झाली. कारण रक्कम कितीही मोठी असली तरी कायद्यात अशा गुन्ह्यासाठी एवढीच शिक्षा देण्याची तरतूद आहे!सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बीव्हीएलएन चक्रवर्ती यांनी रामलिंग राजू व त्यांचे वडीलबंधू आणि सत्यम्चे त्या वेळचे व्यवस्थापकीय संचालक रामा राजू यांना सात वर्षांच्या कारावासाखेरीज प्रत्येकी साडे पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला. याखेरीज इतर आठ आरोपींना तेवढ्याच कारावासाच्या शिक्षेसोबत प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड झाला. शिक्षा जाहीर होताच जामिनावर असलेल्या सर्व आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. शिक्षा तीन वर्षांहून जास्त असल्याने त्यांना आता जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल. या सर्व आरोपींना भादंविच्या १२०बी, ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए आणि २०१ या कलमांन्वये दोषी धरले गेले. बनावट पद्धतीने खातेपुस्तके लिहून कंपनी उत्तम वित्तीय स्थितीत असल्याचे चित्र निर्माण करून एकीकडे गुंतवणूकदारांची फसवणूक करणे व दुसरीकडे स्वत:ची तुंबडी भरून घेणे असे त्यांच्यावर आरोप होते.स्वत: बी. रामलिंग राजू यांनीच ७ जानेवारी २००९ रोजी सत्यम्च्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून कंपनीत कित्येक वर्षे चाललेल्या या घोटाळ्याची कबुली दिली होती. त्यानंतर सरकारने आयोजित केलेल्या लिलावात सत्यम् टेक महिंद्र कंपनीने घेतली व त्यानंतर ही कंपनी या नव्या नावाने सुरू आहे. आजच्या या निकालाने या घोटाळ्यातील मुख्य फौजदारी खटल्याची सांगता झाली असली तरी याअनुषंगाने इतरांनी दाखल केलेले सुमारे अर्धा डझन फौजदारी खटले व दिवाणी दावे अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षा झालेले इतर आरोपी असे- सत्यम्चे तत्कालीन मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवास वाडलामणी. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षण करणाऱ्या प्राईस वॉटरहाउस या दिग्गज फर्मचे भागीदार एस. गोपालकृष्णन व तालुरी श्रीनिवास, कंपनीचे अंतर्गत हिशेब तपासनीस बी. सूर्यनारायण राजू आणि प्रभाकर गुप्ता, वित्त विभागाचे प्रमुख जी. रामकृष्ण आणि डी. लक्ष्मीपती व व्यंकटपती राजू या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)