शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 13:51 IST

समन्यू पोथूराजूची अभिमानास्पद कामगिरी

हैदराबाद: अवघ्या सात वर्षांच्या समन्यू पोथूराजूनं देशाची मान अभिमानानं उंचावणारी कामगिरी केली आहे. हैदराबादच्या समन्यू पोथूराजूनं आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर केलं आहे. समन्यूनं आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. ध्येय कितीही मोठं असलं, तरी अथक प्रयत्नानंतर ते कमी वयातही साध्य करता येतं, हे समन्यूनं दाखवून दिलं आहे. आफ्रिकेच्या टांझानियातील माऊंट किलिमांजारो शिखर करणं अवघड मानलं जातं. या भागातील तापमान कमी असल्यानं पर्वतावर चढाई करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सर्व अडचणींवर मात करत सात वर्षांच्या समन्यूनं समुद्रसपाटीपासून 5 हजार 895 मीटर उंचीवर असणारं किलिमांजारो शिखर त्याच्या प्रशिक्षकांसोबत सर केलं. 'जेव्हा आम्ही चढाई सुरू केली, तेव्हा पाऊस सुरू होता. संपूर्ण वाट दगडांनी भरलेली होती. त्यावेळी मी अतिशय घाबरलो होतो. माझे पाय खूप दुखत होते. मात्र मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाई सुरू केली. मला बर्फ खूप आवडतो. त्यामुळेच चढाईसाठी किलिमांजारो शिखराची निवड केली,' असं समन्यूनं सांगितलं. समन्यू किलिमांजरोवर सर्वात कमी वयात यशस्वी चढाई करणारा गिर्यारोहक ठरला आहे. आता त्याला ऑस्ट्रेलियातील शिखरं खुणावू लागली आहेत. समन्यूच्या कामगिरीवर त्याची आई प्रचंड खूष आहे. 'माझ्या मुलानं विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला, याचा खूप आनंद आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव त्याची साथ देता आली नाही. मात्र त्यानं हार न मानता प्रयत्न कायम ठेवले आणि तो यशस्वी झाला,' अशी प्रतिक्रिया समन्यूच्या आईनं दिली.